वृत्तसंस्था
बीड : मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली आहे. Only after getting Maratha-OBC reservation,I Will accept Flower Garland’s And feta: Pankaja Munde’s decision
बीड शहरामध्ये जिल्ह्यातील राजपूर बूथ कार्यकर्त्यांकडून आयोजित केलेल्या वर्कशॉपमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बीड जिल्ह्यानं नवा आदर्श घालून दिला पाहिजे. आजपासून कोणीही मला हार घालणार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे स्वीकारणार नाही.
तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. तोपर्यंत फेटाही बांधणार नाही. समाज बंधावांनी मराठा-ओबीसीमध्ये वाद पेटविणाऱ्यांपासून सावधान व्हावे. तसेच छत्रपती शिवरायांचा सामाजिक अभिसरणाचा आदर्श घेण्याची गरज आहे.”
Only after getting Maratha-OBC reservation,I Will accept Flower Garland’s And feta: Pankaja Munde’s decision
महत्त्वाच्या बातम्या
- जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले
- शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
- पेगाससचा हेरगिरीचा मुद्दा संवेदनशील, तो विरोधकांनी सनसनाटी बनविला; सरकार स्वतंत्र चौकशी समिती बनविण्यास तयार; सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र
- राज्यपालांनी ८० व्या वर्षी सर केला सिंहगड, महिलांनी कौतुकाने ओवाळले; उत्तराखंडमध्ये येण्याचे स्थानिकांना आमंत्रण
- शिवाजी महाराज हे देशाचा अभिमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली सिंहगडाला भेट