• Download App
    Meeting in Delhi: Sunetra Pawar and Maharashtra Leaders Meet Amit Shah to Lift Onion Export Ban कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी दिल्ली दरबारात हालचाली; अमित शहांसोबत सुनेत्रा पवारांची महत्त्वाची बैठक

    Sunetra Pawar : कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी दिल्ली दरबारात हालचाली; अमित शहांसोबत सुनेत्रा पवारांची महत्त्वाची बैठक

    Sunetra Pawar

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Sunetra Pawar महाराष्ट्रातील कांदा दर घसरणीमुळे शेतकरी आक्रमक झाले असताना राज्य सरकारने आता थेट दिल्ली दरबारात धाव घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महायुती नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी हटवणे, खरेदीदर वाढवणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा करणार आहेत.Sunetra Pawar

    राज्यात विशेषतः नाशिक, अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. उत्पादन खर्च 18 ते 20 रुपये किलोपर्यंत जात असताना केंद्राने सुरुवातीला केवळ 12.35 रुपये किलो दराने खरेदी जाहीर केली होती. शेतकरी संघटनांच्या तीव्र आंदोलनानंतर हा दर वाढवून 15.80 रुपये किलो करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी तोही अपुरा असल्याचे सांगितले आहे.Sunetra Pawar



    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने केंद्राकडे कांदा निर्यातबंदी आणि निर्यातवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. सरकारच्या मते, निर्यात सुरू झाल्यास देशांतर्गत बाजारात मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकेल. यापूर्वीही केंद्राने कांदा निर्यातीवरील 20 टक्के शुल्क हटवल्यानंतर लासलगावसारख्या बाजारांमध्ये कांद्याचे दर वाढल्याचे दिसून आले होते.

    दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादकांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. शेतकऱ्यांनी किमान 3 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव, पूर्वीच्या नुकसानीसाठी अनुदान आणि निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून विरोधकांनीही सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

    सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कृषी आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांची ही पहिली मोठी दिल्ली पातळीवरील राजकीय बैठक मानली जात आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर असल्याचा संदेश देण्याचाही प्रयत्न या बैठकीतून केला जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदा प्रश्न हा राज्यातील मोठा राजकीय मुद्दा बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Meeting in Delhi: Sunetra Pawar and Maharashtra Leaders Meet Amit Shah to Lift Onion Export Ban

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    साखर, इथेनॉल आणि कांदा प्रश्नांवर केंद्र सरकारचे सकारात्मक निर्णय; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा!!

    Bawankule : मोदी-फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका सहन करणार नाही; बावनकुळेंचा सपकाळांना इशारा

    CM Devendra Fadnavis : अर्थखाते सुनेत्रा पवारांकडे जाणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट विधान; चर्चांना दिला पूर्णविराम