विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीतील तीन पक्षच एकमेंकांचे नेते फोडायला लागल्यामुळे तीन पक्षांची समन्वय समिती नेमण्यात आली. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॉँग्रेसने शिवसेनेचा माजी माजी आणि जिल्हा प्रमुख फोडला आहे. आत्तापर्यंत शिवसेनेतून अनेक जण राष्ट्रवादीकडे जात होते. प्रथमच शिवसेनेचा कोणी नेता कॉँग्रेसमध्ये गेला आहे. On the second day after the appointment of the coordination committee to prevent defection, Former Shiv Sena minister, former Thane district chief interest in Congress
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांनी एकमेंकांवरच कुरघोडी सुरू केल्या आहेत. प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडणे सुरू केले आहे. याचा सर्वाधिक फटका आत्तापर्यंत शिवसेनेला बसला होता. त्यामुळे तीन पक्षांची एक समन्वय समिती नेमण्यात आली होती.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही समिती नेमल्याच्या दुसºयाच दिवशी शिवसेनेचे दोन नेते कॉँग्रेसमध्ये गेले आहेत. शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी कॉँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील माजी आमदार आहेत. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अशोक शिंदे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
त्याचसोबत युती सरकारच्या काळात अशोक शिंदे यांच्याकडे उद्योग राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. १९९५ मध्ये पहिल्यांदा अशोक शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर विदभार्तील वर्धा जिल्ह्यात निवडून आले होते. मागील काही दिवसांपासून पक्ष संघटनेतील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्यासोबत त्यांचे वाद होते. या प्रकरणी पक्षनेतृत्वाकडे न्याय मागूनही मिळाला नाही त्यामुळे अशोक शिंदे काँग्रेसच्या वाटेवर गेले आहेत.
ठाण्यातील शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्य पदाबरोबरच ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून ते जिल्ह्याच्या राजकारणात ओळखले जातात. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे यांनी जाहीर बंड पुकारले होते. त्यामुळे सेना भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे शिवसेना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती.
On the second day after the appointment of the coordination committee to prevent defection, Former Shiv Sena minister, former Thane district chief interest in Congress
महत्त्वाच्या बातम्या
- Yashpal Sharma Death : 1983च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन, अशी होती त्यांची क्रिकेट कारकीर्द
- अभिमानास्पद : मराठी माणसाकडून इलेक्ट्रिक कारची निर्मिती, कांबळे बंधूंची स्वदेशी डेक्स्टो कार लवकरच धावणार रस्त्यावर
- नाना पटोले राज्यातील अतिमहत्त्वाचे नेते, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये, संजय राऊतांचा सल्ला
- पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत बैठक, कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर काय निर्णय घेणार?