विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर सर्व वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी ,असे आवाहन महामार्ग पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी केले आहे.पुणे – नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टरच्या पाठीमागे रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे.On Pune-Nashik highway Drivers should be careful
मार्गावर सर्व दिंड्या येत आहेत. साई बाबांच्या शिर्डीला जात आहेत. त्या दिंडीच्या सर्व साई भक्तांनी रोडच्या एका बाजूस चालावे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. महामार्ग पोलीस भालचंद्र शिंदे यांनी बोटा येथे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये रोड बाबत जनजागृती देखील आज केली.
- पुणे-नाशिक महामार्गावर चालकांनी खबरदारी घ्यावी
- महामार्ग पोलिसांचे आवाहन
- उसाच्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बंधनकारक
- महामार्गावर अपघाती मृत्यूची संख्या देखील वाढली
- दिंडीच्या साई भक्तांनी रोडच्या एका बाजूस चालावे