हनुमान जयंती निमित्त कर्तव्यावर असताना चाललेली भांडणे पाहुन मध्यस्थी करणार्या पोलिस कर्मचार्यांचा हाताचा एकाने चावा घेतल्याचा प्रकार विश्रांतवाडी येथील एकतानगर येथे घडला. On police duty constable injured in Quarrel vishrantwadi area
विशेष प्रतिनिधी
पुणे : हनुमान जयंती निमित्त कर्तव्यावर असताना चाललेली भांडणे पाहुन मध्यस्थी करणार्या पोलिस कर्मचार्यांचा हाताचा एकाने चावा घेतल्याचा प्रकार विश्रांतवाडी येथील एकतानगर येथे घडला. याप्रकरणी चावा घेणार्याला विश्रांतवाडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळला आणल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.
बाजीराव बाळु सुकळे (33, रा. कर्वेनगर, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अमंलदार प्रितम जंगम यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हनुमान जन्मोत्सवा निमित्त जंगम विश्रांतवाडी येथील एकातानगर येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना बाजीराव सुकळे आणि बजरंग दगडे यांच्यामध्ये भांडण व मारामारी सुरू असल्याचे दिसले. जगंम तात्काळ दोघांची भांडणे सोडविण्यासाठी व शांतता आबाधीत राहण्यासाठी धावले. ते त्यांचे काम करीत असताना भांडणे सोडविल्याच्या रागातून सुकळे हा त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर त्याने त्यांच्या हाताचा चावा घेत त्यांना जखमी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. माळी करीत आहेत.
On police duty constable injured in Quarrel vishrantwadi area
महत्त्वाच्या बातम्या
- Sri Lanka Crisis : आयएमएफसोबतच्या कराराला 4 महिने लागतील, तोपर्यंत भारताला अधिक आर्थिक मदतीची मागणी
- Akshay Kumar : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, सेन्सॉर बोर्डाच्या माजी प्रमुखांनी केली टीका
- ओवेसींच्या पक्षाचे आझम खान यांना निमंत्रण : AIMIM प्रवक्त्याने पत्रात म्हटले – अखिलेश मुस्लिमांचे हमदर्द नाहीत; तुम्हाला तुरुंगात मरायला सोडले
- Raj Thackeray : ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा अल्टीमेटम, म्हणाले- ‘हिंदूंनी तयार राहावे, 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे’