वृत्तसंस्था
मुंबई : ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुंबईत निर्बंध लागू केले असून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोनाच्या दुसरी लाट लाट नियंत्रणात आली आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०२ टक्के आहे.Omicron threatens third wave of corona, restrictions imposed in Mumbai; Appeal to care
लसींचा पहिला डोस शंभर टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर ७५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, कोविडचा नवीन प्रकार ओमायक्रॉन या विषाणूचे आव्हान आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन काही निर्बंध लागू केले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, हाच नियम आता सर्वत्रच लागू झाला आहे. त्यामुळे मॉल, दुकान अथवा कार्यालयातदेखील लसीकरण पूर्ण झालेल्यानाच प्रवेश देण्यात येत आहे.
- मुंबईत लसीकरण असेल तरच बसचा प्रवास
- दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसमध्ये प्रवेश
- लसीकरण झालेल्याना रेल्वेने प्रवास परवानगी
- दुकान, मॉल आदी दोन डोस घेतलेल्यानाच प्रवेश
Omicron threatens third wave of corona, restrictions imposed in Mumbai; Appeal to care
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं : अल्पवयीन भावानेच बहिणीची केली निर्घृण हत्या, हत्या केल्यावर सेल्फीही काढली
- उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत, विशेष मदतीचे पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी यांची मागणी
- MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-203 रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ;०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा
- वसीम रिझवींनी इस्लाम सोडून आजपासून स्वीकारला हिंदू धर्म, यति नरसिंहानंद यांनी दिला सनातन धर्मात प्रवेश
- प्रियंका चतुर्वेदी यांच्यापाठोपाठ शशी थरुर यांचाही संसद टीव्हीचा राजीनामा