विशेष प्रतिनिधी
नागपूर : OBC Community मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता राज्यात ओबीसी समाजाचे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत. सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून, या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. नागपूरमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमधील ओबीसी नेते उपस्थित होते.OBC Community
महामोर्चासाठी 25 लोकांची असणार समिती
ओबीसी समाजाच्या या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो. हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. याविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपूरात ओबीसींचा महामोर्चा काढणार आहोत.OBC Community
आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ देण्याचे वडेट्टीवारांचे आवाहन
वडेट्टीवार म्हणाले, आज ओबीसींसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते. मात्र नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपसूकच दूर होईल. ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही. मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे. कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
ओबीसींची दोन स्तरांवर लढाई
नागपूरात 12 सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगाने व्यूहरचना निश्चित होईल. मात्र दोन स्तरावर लढाई लढण्याचे शनिवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे. विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयात बाजू मांडणार आहे. तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल. कुणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमची भूमिका असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
OBC Community To Protest Against Maratha Reservation, Mahamorcha In Nagpur In October
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांची टीका- नितीश कुमार फक्त निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्री राहतील, नवीन CM कोण हे शहा ठरवतील
- Vanraj Andekar murder revenge : वनराज आंदेकर खुनाचा बदला खुनाने ; पुण्यात आयुष कोमकरची हत्या.
- GST : जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी सरकारची काटेकोरपणे देखरेख
- Khadki gets its original name again : खडकीला पुन्हा मूळ नाव; 200 वर्षांनंतर ब्रिटिशकालीन ‘किरकी’ला निरोप