• Download App
    सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीतूनही करा विमानप्रवास; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील । now passenger flights from Ratnagiri; Important instructions given by CM Uddhav Thackeray

    सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीतूनही करा विमानप्रवास; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील

    वृत्तसंस्था

    मुंबई : सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. now passenger flights from Ratnagiri; Important instructions given by CM Uddhav Thackeray

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  गुरुवारी एक बैठक घेतली. त्यात ही चर्चा झाली. दिले. या विमानतळासाठी निधी दिला जाईल, असे ते म्हणाले.
    रत्नागिरीचा विमानतळ हा तटरक्षक दलाच्या अखत्यारित आहे. तेथे नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी विस्तार करावा  लागणार आहे. दोन गावांमधील ३३.८१ हेक्टरचे  भूसंपादन केले जाणार आहे. जागेची संयुक्त मोजणीही झाली आहे.



    आता भूसंपादन व इतर कामांसाठी ७२ कोटी रुपयांची गरज असल्याची बाब महाराष्ट्र एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले. त्यावर, रत्नागिरीचा विमानतळ होणे हे कोकणच्या विकासाठी गरजेचा असल्याने निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीला पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.

    now passenger flights from Ratnagiri; Important instructions given by CM Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर