विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्विकास शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “मिरवून” घेतले असले तरी प्रत्यक्षात बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची “वर्क ऑर्डर” दीड वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या काळात काढण्यात आली होती. त्यानंतर दीड वर्षांच्या विलंबाने ठाकरे – पवार सरकारने बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभाचा कार्यक्रम केला आहे. Now BJP targets CM uddhav Thackeray and sharad pawar over BDD chawal redevelopment program
खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच ट्विट करून आपल्या कारकीर्दीत याची “वर्क ऑर्डर” निघाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावेळी फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री देखील सामील होतेच. आता मात्र आपण नव्याने काहीतरी करत आहोत, असे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दाखविले.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
त्याच बरोबर आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे. #BDDChawl #Mumbai असा टोला आहे फडणवीस यांनी दुसऱ्या ट्विट मधून मारला आहे.
त्यामुळे बीडीडी चाळी पुनर्विकासाच्या श्रेयाचा वाद फक्त आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच राहिलेला नसून त्यामध्ये भाजपने देखील आपण केलेल्या कामाचा उल्लेख करून उडी घेतली आहे. फडणवीस सरकारच्या काळात खरंच एकदा बीडीडी चाळ चाळीच्या पुनर्वसनाचे भूमिपूजन झाल्याचे दाखले आहेत. त्यामुळे आज झालेला कार्यक्रम हा दुसऱ्यांदा केलेला कार्यक्रम असल्याचेही स्पष्ट होत आहे.
Now BJP targets CM uddhav Thackeray and sharad pawar over BDD chawal redevelopment program
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार
- अधिवेशनाचे २ आठवडे संसदेत नुसता गोंधळ : १०७ तासांपैकी केवळ १८ तास काम, १३३ कोटींचे नुकसान; राज्यसभा २१% , तर लोकसभेत फक्त १३% कामकाज