विशेष प्रतिनिधी
मुंबई : Narhari Zhirwal राज्य मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणाशी माझा संबंध नसून माझी बदनामी करून कुणाला तरी मंत्रिपद हवे आहे,’ असा आरोप अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला. २००४ पासूनच्या राजकीय कारकिर्दीत चारित्र्यावर कुणीही बोट ठेवू शकले नाही, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.Narhari Zhirwal
मंत्रालयात झिरवाळ यांच्या दालनात लिपिक राजेंद्र ढेरंग याला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर बोलताना झिरवाळ म्हणाले की, “कार्यालयातील कर्मचाऱ्याने केलेली चूक म्हणजे मंत्र्यांचा त्यात सहभाग आहे, असा होत नाही. हा कोणताही राजकीय ‘ट्रॅप’ असल्याचे मला वाटत नाही, पण या प्रकरणाचा वापर करून माझी प्रतिमा मलिन केली जात आहे.’ या गंभीर मुद्द्यावर आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.Narhari Zhirwal
मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची ‘कुंडली’ तपासावी- सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. “अशा घटनांमुळे सरकार आणि पक्षाची प्रतिमा मलिन होते. मंत्र्यांनी आपल्या दालनात कर्मचारी नियुक्त करताना त्यांची ‘पूर्वचारित्र्य पडताळणी’ करणे अनिवार्य आहे. भ्रष्टाचाराचे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,’ अशा स्पष्ट सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत.
‘Not Linked to Bribery’: Minister Narhari Zhirwal on Clerk’s Arrest
महत्वाच्या बातम्या
- टिपू सुलतानची तरफदारी करून हर्षवर्धन सपकाळांनी मोदींच्या वक्तव्यातले सत्यच तर सिद्ध केले!!
- Nikhil Gupta : खालिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटाचे प्रकरण; भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 24 वर्षांची शिक्षा
- Trump’s : ट्रम्प म्हणाले- व्हेनेझुएलामध्ये गुप्त शस्त्राचा वापर केला; रशिया-चीनच्या संरक्षण प्रणाली निकामी झाल्या
- ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स : कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा; नागपुरात जागतिक परिषदेचे उद्घाटन