• Download App
    Not afraid of Mushrif's threats, from where will he bring money for stamp duty in white to file a claim of Rs 100 crore

    मुश्रीफ यांच्या धमक्यांना घाबरत नाही, शंभर कोटींचा दावा दाखल करायला स्टॅम्प ड्युटी व्हाईटमध्ये पैसे कोठून आणणार?चंद्रकांत पाटील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या़च्यावर किरीट सोमय्या यांनी अभ्यासपूर्वक आरोप केलेत, पण मुश्रीफ म्हणे माझ्यावर दावा दाखल करणार आहेत. मी असल्या धमक्यांना घाबरत नाही.100 कोटींचा दावा दाखल करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी व्हाईटमध्ये पैसे कोठून आणणार असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केला आहे. Not afraid of Mushrif’s threats, from where will he bring money for stamp duty in white to file a claim of Rs 100 crore

    पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, किरीट सोमय्या यांनी सगळीकडे फिरून अभ्यास करावा व घोटाळे उघड करावेत असे आमच्या कामाचे वाटप आहे. पण माझे नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ यांना झोप येत नाही, माझे नाव हीच त्यांच्यासाठी गोळी आहे. सध्या सगळे घोटाळे मोठ्या रकमेचे निघत आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांनी १०० कोटीचा नाही तर ५०० कोटीचा दावा दाखल करावा. पण त्यासाठी स्टँम्प ड्युटी व्हाईट मनीमध्ये भरावी लागते ते कुठून आणणार हेही त्यांनी सांगावे.



    छगन भूजबळ यांना क्लीन चीट मिळाली यावर पाटील म्हणाले, काय झाले ते त्यांना व त्यांच्या वकिलांनाच माहिती आहे. १०० कोटीची मालमत्ता जप्त झाली आहे हे मात्र सर्वांना ठाऊक आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सोमय्या यांनी ३०० कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले, पण त्यांना तर मंत्रीपदाचे बक्षिस मिळाले ते कसे या प्रश्नावर पाटील यांनी राणेच काय, पण भाजपाचा कोणीही कार्यकर्ता चुकला तरी सोडणार नाही असे सांगितले. त्यांच्यावर ज्या एजन्सीनी आरोप केले, त्यांनाच तुम्ही त्याचे काय झाले ते विचारा असेही ते म्हणाले.

    आम्ही सरकार अस्थिर करतो आहोत असे म्हणता,पण तुम्ही तर फेव्हिकॉलसारखे घट्ट आहात, तर मग घाबरता कशाला असा प्रश्न पाटील यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री बदलले तर बदलले. असा विषय फक्त भाजपाच करू शकते. विरोधी पक्षांना तर राष्ट्रीय अध्यक्षच नाही. याबाबत त्यांना निवडणूक आयोगाने विचारणा केली आहे अशी टीका पाटील यांनी केली. इथे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र, राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही याचे ऊत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे पाटील म्हणाले.

    Not afraid of Mushrif’s threats, from where will he bring money for stamp duty in white to file a claim of Rs 100 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस