विशेष प्रतिनिधी
नाशिक : भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदली नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे यांच्या या इशाऱ्यामुळे भोंदू खरात प्रकरणात नाव येण्याची शक्यता असणाऱ्या अधिकारी वर्गात एकच खळबळ माजली आहे. Ashok Kharat
भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या सर्वच प्रकरणांची एसआयटी अर्थात विशेष तपास पथक कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी खरातला मदत केल्याची माहितीही पुढे येत आहे. यात मंत्रालयापासून स्थानिक पातळीपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.
सर्वच अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी बोलताना म्हणाले, अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली केली जाणार नाही. त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार. मग हे अधिकारी कोणत्याही खात्याचे असले तरी काही फरक पडणार नाही. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. एसआयटी या प्रकरणी योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे यासंबंधी कुणाकडे काही पुरावे असतील तर ते एसआयटीला द्यावेत. नाशिकच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे जे काम झाले आहे, त्या लोकांवर अत्यंत कडक कारवाई केली जाईल.
आमच्या अधिकाऱ्यांनी खरातला मदत केली असेल तर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. एसआयटी टीमकडून आमच्याकडे नाव आल्यानंतर त्यांना नोकरीवर ठेवले जाणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणात कुणीही सुटणार नाही. या प्रकरणी खरातच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशोक खरातला जमिनी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.
सीएमओने बावनकुळेंना माहिती पुरवली नाही
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री कार्यालय माहिती पुरवत असल्याचा आरोपही फेटाळून लावला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय अशी माहिती देणार नाही. त्यांनी स्वतः ही माहिती काढली असेल. त्यांनी त्यांच्याकडे असणारी माहिती एसआयटीला द्यावी. शिर्डी प्रकरणात माझ्याकडे सुनावणी लावली तर मी त्यावर निर्णय घेतो. दुष्कृत्यामध्ये सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे ते म्हणाले.
No Transfers, Only Dismissal: Bawankule Warns Officials Aiding Ashok Kharat
महत्वाच्या बातम्या
- शिवछत्रपतींनी उभारलेले किल्ले संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन; खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदींचे प्रतिपादन
- Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार
- Amit Shah : शहा म्हणाले- 15 दिवस बंगालमध्ये राहणार; ममतांना त्यांच्याच घरात हरवायचे आहे, TMCला खाडीत फेका
- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बारामती मध्ये काँग्रेसला राजकीय पुनरुज्जीवनाची संधी!!