मुंबईतील सावरकर गौरव यात्रेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. या विरोधात आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. मुंबईतील सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. No one in Congress has the ability to be Savarkar You can not be Savarkar and you can not be Gandhi Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi
उपमुख्यमंत्री फडणवीस भाषणात म्हणाले, ‘’हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि क्रांतीकारकांचे आराध्य दैवत आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यसमरात ज्यांनी क्रांतीकारकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवली, ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. खरंम्हणजे सावरकर गौरव यात्रा ही काढण्याची आवश्यकता का पडली? सावरकरांचा गौरव तर आमच्या मनात आहे. सावरकर पिढ्यांपिढ्या आम्हाला प्रेरीत करतात. पण तरीदेखील आम्हाला पुन्हा एकदा सावरकरांचा गौरव करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं. कारण, या देशात असेही काही लोक जन्माला आले. सोन्याचा चमता तोंडात घेऊन जन्माला आले. त्यांना भारताचा इतिहासही माहिती नाही, भारताचं वर्तमानही माहिती नाही. ज्यांना खऱ्या अर्थाने या देशातील देशभक्त कोण आहे आणि देशद्रोही कोण आहे हेही माहिती नाही. ज्यांचा पक्ष चिनी सरकारच्या पैशांवर जिवंत राहतो, असे लोक आज सावरकरांसारख्या देशभक्ताला, ज्यावेळी दुषणं देतात, शिव्या-शाप देतात त्यांना माफीवीर म्हणतात, त्यावेळी खऱ्या अर्थाने देशभक्तांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि सांगावं लागतं की खरे देशभक्त सावरकर आहेत, तुम्ही देशभक्त नाहीत या देशावर पोसले गेलेले तुम्ही राजकारणी आहात. यापेक्षा दुसरी कुठली ओळख तुमची नाही.’’
याशिवाय, ‘’राहुल गांधी काय म्हणाले होते? म्हणाले मी गांधी आहे, मी सावरकर नाही. मी माफी मागणार नाही. राहुल गांधी तुम्ही कधीच सावरकर होऊ शकत नाहीत. सावरकर होण्याची औकात ही काँग्रेसमध्ये कोणामध्येच नाही. सावरकर होण्यासाठी त्याग लागतो, तप लागतं, यातना भोगाव्या लागतात, सावरकर बनण्यासाठी ११ वर्षे अंदमानातील कालकोठडीत आपल्या शौचालयापेक्षाही कमी जागेत रहावं लागतं आणि तरीही भारत माता की जय म्हणण्याची हिंमत दाखवावी लागते. त्यावेळी खऱ्या अर्थाने सावरकर होता येतं.’’असं फडणवीसांनी सांगितलं.
याचबरोबर, ‘’अरे तुम्ही सावरकरही नाही आणि तुम्ही गांधीही नाहीत. नकली आडनाव घेऊन तुम्ही जे गांधींबद्दल सांगता आहात, तुम्ही गांधी नाही कारण तुम्हाला माहिती पाहिजे, की ज्यावेळी लोकसभेत बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता, त्यावेळच्या काँग्रेसने त्याला विरोध केला, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला होता आणि त्याने त्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं फिरोज गांधी जे तुमचे आजोबा होते. त्यांनीही सावरकरांना सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. पण तुम्हाला इतिहास कुठं माहिती आहे, इतिहासाची तुमचा काय संबंध? म्हणून तुम्ही सावरकरही होऊ शकत नाही आणि गांधीही होऊ शकत नाही.’’ असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
No one in Congress has the ability to be Savarkar You can not be Savarkar and you can not be Gandhi Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा