• Download App
    No one can take away Sharad Pawar; Jayant Patil contradicts Prashant Jagtap's statement शरद पवारांकडून कोणी वदवून घेऊ शकत नाही; जयंत पाटलांचा प्रशांत जगतापांच्या वक्तव्याला छेद

    शरद पवारांकडून कोणी वदवून घेऊ शकत नाही; जयंत पाटलांचा प्रशांत जगतापांच्या वक्तव्याला छेद

    Prashant Jagtap

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही. त्याऐवजी पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येऊनच निवडणूका लढवायच्या या धोरणाला शरद पवारांनी मान्यता दिली, असा दावा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला होता. परंतु, प्रशांत जगताप यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छेद दिलाNo one can take away Sharad Pawar; Jayant Patil contradicts Prashant Jagtap’s statement

    शरद पवार यांच्याकडून कोणीही काहीही वदवून घेऊ शकत नाही. महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणुका लढवणार असेल आणि त्याला बाहेरून कोणी सहकार्य करणार असेल, तर त्यासाठी आमची सुद्धा तयारी असू शकते. यासंदर्भात शरद पवार स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. आमचा पक्ष स्वातंत्र आहे. प्रशांत जगताप आमच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आहेत, अशी पुस्ती सुद्धा त्यांनी जोडली. पण जयंत पाटलांनी प्रशांत जगताप यांच्या मूळ वक्तव्याला छेद द्यायला कमी केले नाही.



    पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायला प्रशांत जगताप यांचा वैयक्तिक विरोध आहे. परंतु ते पक्षाचे शहराध्यक्ष असल्यामुळे त्यांनी शरद पवारांची काल भेट घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आपली आघाडी नको, असे मत व्यक्त केले होते. शरद पवारांनी सुद्धा या मताला सहमती दाखविल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला होता. शरद पवारांनी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नको, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिल्याचा दावा सुद्धा प्रशांत जगताप यांनी केला होता. शशिकांत शिंदे सायंकाळीच तशी घोषणा करतील, असा दावाही प्रशांत जगताप यांनी केला होता. परंतु, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.

    त्याशिवाय प्रशांत जगताप यांच्या या दाव्यातली हवा जयंत पाटलांनी आज दुसऱ्या दिवशी काढून टाकली. आमच्या पक्षाला कोणी सहकार्य करू इच्छित असेल, तर त्याचे सहकार्य घेऊ, असे सांगून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचे दरवाजे खुले ठेवले.

    No one can take away Sharad Pawar; Jayant Patil contradicts Prashant Jagtap’s statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supriya Sule : बारामती नगरपरिषद निवडणूक लढवणारे कार्यकर्ते वाऱ्यावर; सुप्रिया सुळे भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात नाचल्या डान्स फ्लोअर वर!!

    पवार काका – पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!

    Supriya Sule : इंडिगोच्या गोंधळावर सुप्रिया सुळे संतप्त; प्रवाशांचा वेळ, पैसा वाया, जबाबदार कोण? एकाच कंपनीवर अवलंबून राहू नका