• Download App
    ''जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही'' अजित पवारांचं विधान! No one can separate Mumbai from Maharashtra Ajit Pawar

    ”जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही” अजित पवारांचं विधान!

    ”मी खरं बोलतो, थातुरमातुर बोलण्याची मला सवय नाही…” असंही अजित पवारांनी सांगितलं.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतच  आज राज्यातील सत्ताधारी महायुतीचीही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं. No one can separate Mumbai from Maharashtra Ajit Pawar

    अजित पवारांनी म्हटले की, महायुतीच्या बैठकीत बोलताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, मुंबई हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे. म्हणून त्याला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. नीती आयोगाच्या माध्यमातून देशातील चार शहरं निवडण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून मुंबई, गुजरातमधून सूरत, आंध्र प्रदेशमधून विशाखापट्टणम आणि चौथं उत्तर प्रदेशातून वाराणसी. विरोधक सांगतायत हा मुंबई वेगळी करण्याचा डाव. पण महाराष्ट्राला माहिती आहे की मी खरं बोलतो. थातुरमातुर बोलण्याची मला सवय नाही. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही. हे निर्विवाद सत्य आहे”.

    मुंबईच्या विकासासंदर्भात केंद्रीय नीती आयोगाकडून नियोजन आराखडा आणि त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आलं होतं. यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना टीका करण्यास  सुरुवात केली होती.  मुंबईच्या विकासाचा निर्णय आता केंद्र सरकार घेणार का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.

    No one can separate Mumbai from Maharashtra Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना ‘बॅलेट पेपर’वरही भाेपळा, बेस्ट साेसायटीत दारुण पराभव

    बेस्ट पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर शशांक राव + प्रसाद लाड यांना नेमले भाजपने स्टार प्रचारक; मुंबईत आशिष शेलारांनी तयार केले political buffer!!

    Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला १२ वर्ष ; मास्टरमाइंड मात्र अजूनही सापडेना