• Download App
    पुणे आणि गोव्यासाठी नितीन गडकरी आले धावून, ऑक्सिजनचा केला पुरवठा|Nitin Gadkari rushed to Pune and Goa and supplied oxygen

    पुणे आणि गोव्यासाठी नितीन गडकरी आले धावून, ऑक्सिजनचा केला पुरवठा

    पुणे आणि गोव्यात ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी धावून आले. नागपूरहून या दोन्ही ठिकाणी त्यांनी ऑक्सिजनचे टॅँकर पाठविले.Nitin Gadkari rushed to Pune and Goa and supplied oxygen


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : पुणे आणि गोव्यात ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी धावून आले. नागपूरहून या दोन्ही ठिकाणी त्यांनी ऑक्सिजनचे टॅँकर पाठविले.

    दोन ते तीन आठवड्यांपूर्वी नागपुरात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता होती. यावेळी गडकरी यांनी विविध ठिकाणांहून ऑक्सिजनची व्यवस्था केली. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे.



    दररोज शहरात विविध ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे पुण्याला ऑक्सिजनची मागणी वाढली असल्यामुळे नागपुरातून ऑक्सिजनचे चार टँकर पुण्याला पोहोचवण्यात आले.

    पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. गडकरीकडे यासंदर्भात विनंती आली असताना त्यांनी तातडीने ऑक्सिजन पाठविण्याचे निर्देश दिले. गोव्यामध्येदेखील ऑक्सिजनची मागणी वाढत आहे.

    त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार दररोज एक टँकर ऑक्सिजन गोव्याला पोहोचविण्याची सूचना गडकरींनी दिली आहे.

    Nitin Gadkari rushed to Pune and Goa and supplied oxygen

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रोहित पवारांनी तेलगू देशम पार्टीला आणि भाजपला ओढले संशयाच्या जाळ्यात; पत्रकार परिषदेतून आरोप आणि दाव्यांच्या फैरी!!

    Himanta Biswa Sarma : हिमंता म्हणाले-2014 मध्ये सोनिया मला मुख्यमंत्री बनवायला तयार होत्या; राहुल यांनी नेत्यांना फोन करून परिस्थिती बदलली

    Congress-NCP : राज्यातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा 2014चा निर्णय अखेर रद्द; 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने घेतला होता निर्णय