प्रतिनिधी
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवीदान समारंभ येत्या गुरुवारी (दि. २८ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता होणार आहे. कृषि विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी असणार आहेत.Nitin Gadkari and Sharad Pawar received doctorates from Mahatma Phule Agricultural University
“यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरद पवार आणि रस्ते, वाहतूक आणि परिवहन खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे,” अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.
या सोहळ्यास कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठौड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षान्त भाषण करणार आहेत.
यंदाच्या पदवीदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखातील एकुण ११ हजार ४६८ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे दिली जाणार आहे. त्यात विविध विद्याशाखातील १० हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर १०४ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल.
यावेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिकेप्राप्त स्नातक आणि आचार्य पदवी स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. पदवीदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यु-ट्युब चॅनेल तसेच झुम लिंकवरुन केले जाणार आहे.
Nitin Gadkari and Sharad Pawar received doctorates from Mahatma Phule Agricultural University
महत्त्वाच्या बातम्या
- पाटणा मॉडेल मर्डर केस : बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण आल समोर
- महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात , म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं हे सरकार
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करणार की नाही?, आरोपांनंतर एनसीबीकडून विभागीय चौकशी, अचानक दिल्लीला बोलावले
- India T20 WC Final : टीम इंडियाला आता चारही सामने जिंकावे लागतील, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध होऊ शकतो सामना