विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : Nitesh Rane भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी ‘आय लव्ह महादेव’ अशी पोस्ट केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. हे सरळ स्पष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांत आय लव्ह महादेवच चालणार. मी काही पाकिस्तान, कराची इस्लामाबादमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेले नाही, असे राणेंनी म्हटले आहे.Nitesh Rane
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी नितेश राणे यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून या 150 दिवसाच्या कार्यक्रमात चांगले काम, प्रगती दिसली पाहिजे म्हणून एक आढावा बैठक आयोजित केली होती. सगळे खाते प्रमुख चांगले काम आणि गतीमान काम करत आहेत. काही त्रुटी आहेत पण अजून 6 दिवस आहेत. सातत्याने आढावा घेतला जाईल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना जिल्हा पातळीवर जे काम अपेक्षित आहे, ते सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही निश्चित पूर्ण करू. हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आम्ही कामाला लागलो आहोत.Nitesh Rane
केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हाथ पाठवले नाही
महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर विचारले असता नितेश राणे म्हणाले, दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतल्या. काही निकषांचा विषय असतो, काही निधी संदर्भात विषय असतो. केंद्रात आणि राज्यात आम्ही डबल इंजिन सरकार बोलतो, त्याचा फायदा असतो. केंद्र, राज्यात एका विचाराचे सरकार असते तेव्हा राज्य हक्काने केंद्राकडे जाऊ शकते. आत्तापर्यंत नरेंद्र मोदी साहेब, अमित शहांसोबत एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हाथ पाठवले नाही. या संकट काळात नरेंद्र मोदी भरभरून मदत महाराष्ट्राला करतील, असा विश्वास राणेंनी बोलून दाखवला.
दरम्यान, महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते देखील दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाड्याचा दौरा केला. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या पद्धतीने संकटकाळात जनतेसाठी उभे राहण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातला तो भाग संकटात आहे म्हणून जेवढी मदत होऊ शकते तेवढी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
Nitesh Rane: ‘I Love Mahadev’ Will Work Hindu Rashtra
महत्वाच्या बातम्या
- भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार
- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा
- Sonam Wangchuk : लेह हिंसाचारासाठी जबाबदार धरत सोनम वांगचुक यांना अटक