• Download App
    'Tipu Can't Even Touch Shivaji Maharaj's Feet': Nitesh Rane Slams Sapkal टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणे ही जिहादी मानसिकता; टिपू शिवरायांच्या पायाशीही येऊ शकत नाही, नीतेश राणेंचा सपकाळांवर हल्लाबोल

    Nitesh Rane : टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणे ही जिहादी मानसिकता; टिपू शिवरायांच्या पायाशीही येऊ शकत नाही, नीतेश राणेंचा सपकाळांवर हल्लाबोल

    Nitesh Rane

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Nitesh Rane टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही जिहादी मानसिकता दर्शवते. टिपूने लाखो हिंदूंना धर्मांतर केले, मंदिरे नष्ट केली आणि केवळ इस्लाम प्रसारावर लक्ष केंद्रित केले. तो आमच्या शिवरायांच्या पायाशीही येऊ शकत नाही, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानबाबतच्या वादग्रस्त विधानावर टीका केली आहे.Nitesh Rane

    नीतेश राणेंनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काढून फक्त टिपूचे लावले तर बघू, महाराष्ट्रातील मावळे त्यांना कसे परवानगी देतात. हर हर महादेव! असे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आहे, असे वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे.Nitesh Rane



    सपकाळांचा नवा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही

    फडणवीस म्हणाले की, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांच्या तुलनेबद्दल सपकाळांनी माफी मागितली पाहिजे. काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचंदेखील संशोधन केलं पाहिजे. सपकाळ लिहू पाहत असलेला इतिहास महाराष्ट्र, भारत खपवून घेणार नाही.

    काय म्हणाले नीतेश राणे?

    मंत्री नीतेश राणेंनी पोस्ट करत म्हटलंय की, टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात.. ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिर तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्या चे लाऊन दाखवावे मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ! हर हर महादेव ! असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे.

    ‘Tipu Can’t Even Touch Shivaji Maharaj’s Feet’: Nitesh Rane Slams Sapkal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Raut : संजय राऊतांनी टोचले ठाकरे बंधूंचे कान; म्हणाले – ‘महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते’

    Amit Satam : हर्षवर्धन सपकाळांनी नाक घासून माफी मागावी; भाजप नेते अमित साटम यांची मागणी, म्हणाले- हा शिवप्रेमींच्या श्रद्धेवर घाला

    Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक; तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर