• Download App
    महाबळेश्वरच्या गुहांतील वटवाघुळांमध्ये आढळला घातक निपाह व्हायरस ; संशोधन अहवालात स्पष्ट। Nipah virus Is found In the Bats of Mahabaleshwar caves

    महाबळेश्वरच्या गुहांतील वटवाघुळांमध्ये आढळला घातक निपाह व्हायरस ; संशोधन अहवालात स्पष्ट

    वृत्तसंस्था

    पुणे : राज्यात कोरोना, म्युकरमायकोसिस संसर्ग सुरु असताना साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. Nipah virus Is found In the Bats of Mahabaleshwar caves

    राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा घातक विषाणू आढळला आहे.  जर हा विषाणू माणसांमध्ये आला तर तो अत्यंत धोकादायक समजला जातो. कारण त्यावर उपाय नाही आणि हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो, असे रिसर्च पेपरमध्ये सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी केरळमध्ये निपाह हा विषाणू आढळला होता. फैलाव झाल्यामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला.



    ‘निपाह’ विषाणू म्हणजे काय?

    • जनावरे आणि माणसावर वेगाने हल्ला करतो आणि गंभीर आजार निर्माण होतात
    • पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, १९९८ मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगईमधील निपाह नावाच्या गावात विषाणू सापडला
    • सुरुवातीला डुकरांना लागण झाली, नंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पसरला
    • बांगलादेश आणि मलेशियात प्रमाण जास्त
    • ‘निपाह’ची लक्षणं कोणती ?-
    • संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्क आल्यामुळे थेट मेंदूवर हल्ला करतो
    • मेंदुत ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण
    • सुरुवातीला ७-१० दिवस ताप, थकवा, शुद्ध हरपणं, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळणं, अस्वस्थ वाटणं
    • तत्काळ उपचार न घेतल्यास पुढील २४-४८ तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता

    Nipah virus Is found In the Bats of Mahabaleshwar caves

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा