विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nilesh Rane माझ्या मनात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आदर आहे आणि तो कायम राहणार आहे. माझ्यात आणि रवींद्र चव्हाण यांच्यात कसला वाद होता? मी स्वबळावर निवडणूक लढवली. माझी इच्छा होती की युती व्हावी पण ती झाली नाही, मी पाठलाग करत एका ठिकाणी पोहोचलो आणि तो जनतेसमोर ठेवला, असे म्हणत शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी शिवसेना-भाजप वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.Nilesh Rane
नीलेश राणे म्हणाले की, मी जर निवडणुकीत भूमिका बदलली असती तर मला प्रश्न विचारु शकतात. मी चव्हाण, फडणवीस यांना भेटणार ही मी निवडणुकीच्या वेळी सुद्धा म्हटलो होतो. भाजप हे देखील माझे कुटुंब आहे. मी फारकत घेऊ शकत नाही. आमच्या कुटुंबाचा विषय आहे आम्ही बघून घेऊ. मी निवडणूक लढण्यात कुठेही कमी पडलेलो नाही. शेवटपर्यंत मी राणे साहेबांचे नाव घेत होतो. ही निवडणूक लढण्याची पद्धत नाही असेच तेव्हाही बदलली नाही आजही नाही. मी नेत्यासमोर बाजू मांडणार आहे.Nilesh Rane
मी तक्रार मागे घेणार नाही
नीलेश राणे म्हणाले की, मी केलेल्या तक्रारी मागे घेणार नाही, कारण मी ज्यांच्यासाठी तक्रार केली आहे त्यांच्यावर अन्याय होईल. भाजपमधून कोणी मला तक्रार मागे घ्या असे कुणीही सांगितले नाही. मी जे केले त्यातून माघार घ्यायचा प्रश्नच नाही.माझे नेते काय न्यायदेतील या प्रतिक्षेत मी आहे. त्यांना भेटल्यावर न्याय मिळाला का नाही हे तुम्हाला सांगेल. मी केवळ आरोप केला नाही तरा पुरावे देखील दिले आहेत. माझा कोणावरही राग नाही. पण निवडणूक अशी होता कामा नये.
चव्हाण, फडणवीसांची भेट घेणार
नीलेश राणे म्हणाले की, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो आणि ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते. यात माझे पर्सनल असे काहीही नाही.आमचे कुटुंब एकच आहे, आम्ही हिंदूत्वासाठी एकत्र आलेलो आहोत.कुटुंब एकच रहावे यासाठी मी आधीपासून मागणी करत होतो. पण तसे काही झाले नाही, निवडणूक संपली. मी रवींद्र चव्हाण यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटणार आहे. हा काही पर्सनल विषय नव्हता.
एकत्र निवडणूक लढवावी
नीलेश राणे म्हणाले की, नगरपालिकेची निवडणूक झाली तशी कोणतीच निवडणूक यापुढे होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.आमची ताकद एकत्र आहे, त्या ताकदीने लढलो तर अपेक्षित असणारा निकाल नक्कीच मिळेल हे माझे पहिल्यापासून म्हणणे आहे. बातम्यामध्ये जसे वातावरण दाखवण्यात आले तसे वातावरण नव्हतेच. मी त्यावर आक्षेप घेतला होता. मी कोणावर टीका केली नाही.मी आणि नीतेश राणे या दोघांनीही असे काहीच विधान केले नाही की आमच्यात वाद आहे असे वाटेल. रवींद्र चव्हाण यांच्यावरही मी व्यैयक्तिक टीका केली नाही. केवळ इतकेच म्हटले होते की निवडणुकीची जी संस्कृती आहे ती आपल्या जिल्ह्यात नसावी हीच माझी भूमिका होती.
Nilesh Rane Clarifies Ravindra Chavan Dispute Shiv Sena BJP Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- पृथ्वीराज बाबांनी लावलेले जाळे फडणवीस यांनी तोडले; पण पण मुख्यमंत्रीपदासाठी हावरट झालेली राष्ट्रवादी त्यात अडकली!!
- Odisha Women : कर्नाटकातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची एक रजा मिळेल; वर्षातून अशा 12 सुट्ट्या
- Putin India visit : ट्रम्प टेरिफला वाटाण्याच्या अक्षता; रशिया बिनदिक्कत सुरू ठेवणार भारताला इंधन पुरवठा!!
- Putin : द फोकस एक्सप्लेनर : पुतिन यांची भारताला दोस्तीची हमी आणि पश्चिमेला बदलत्या शक्ती-संतुलनाचे संकेत