प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (17 फेब्रुवारी) संध्याकाळी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती राज्याच्या राजशिष्टाचार विभागातर्फे देण्यात आली आहे. नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी (18 फेब्रुवारी) राजभवन येथील दरबार हॉलमध्ये दुपारी 12.40 वाजता आयोजित करण्यात आला आहे.Newly appointed Governor Ramesh Bais will be sworn in on Saturday: He will enter Mumbai on Friday evening
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी रमैश बैस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली होती. कोश्यारींना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी निरोप देण्यात आला. नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी रमेश बैस शुक्रवारी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाने जाहीर केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.
कोण आहेत रमेश बैस?
बैस यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर महानगरपालिका, मध्य प्रदेश विधानसभा आणि नंतर लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. बैस सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत होते.
रमेश बैस यांनी छत्तीसगडमधील रायपूरचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. सामाजिक जीवनाला सुरुवात करून राजकारणात आल्यानंतर बैस 1978 मध्ये रायपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते. आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी झाला. 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.
1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले.
1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला.
छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात बैस यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही अनेक खाती सांभाळली.
Newly appointed Governor Ramesh Bais will be sworn in on Saturday: He will enter Mumbai on Friday evening
महत्वाच्या बातम्या
- #PragatiKaHighwayGatiShakti : UPA काळात दिवसाला 12 किमी, तर NDA सरकारमध्ये दिवसाला 37 किमी महामार्ग बांधणी
- मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये गुंजणार वीर सावरकर लिखित छत्रपती शिवरायांची आरती!!; वाचा ही संपूर्ण आरती!!
- कसब्यात धंगेकरांपुढे काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष बरोबर ठेवण्याचे आव्हान; रासने – भाजप पुढे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान!!
- अमित शाहांचा पुणे दौरा माध्यमांनी जोडला फक्त पोटनिवडणुकीशी, पण ती तर महाराष्ट्र दिग्विजयाची नांदी!!