वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थ यांना श्री भगवती मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.New rules issued by Saptashrungi temple, no vaccination, no darshan
विशेष प्रतिनिधी
नाशिक : सध्या कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.त्यामुळे प्रशासन सावध झाले आहे.दरम्यान साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी – वणी गडावर प्रशासनाने पुन्हा निर्बंध जारी केले आहे.आता कोविड लस घेतलेल्यांनाच दर्शन मिळणार आहे.लसीकरणाचे किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना श्री भगवती मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
तसेच वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थ यांना श्री भगवती मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.ज्या भाविकांना श्री भगवती मंदिर दर्शन रांगेत रोप वे अथवा पायी मार्गे प्रवेश करावयाचा असेल त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे.
संस्थेने www.ssndtonline.org संकेस्थळावर ई दर्शन पास उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांनी ई-दर्शन / ऑनलाईन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
New rules issued by Saptashrungi temple, no vaccination, no darshan
महत्त्वाच्या बातम्या
- चिडीचा एकतर्फी डाव; मालिकांच्या “सत्याची” काँग्रेसच्या कुंपणापर्यंतच धाव!!
- WATCH : सांगलीचे डॉक्टर बेमुदत संपावर प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा आग्रह
- समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळाली नाही, एनसीबीतील सेवा संपली, आता पुन्हा एकदा कस्टम्स विभागाची जबाबदारी
- Lockdown Again? : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार, वडेट्टीवार आणि राजेश टोपे काय म्हणाले? वाचा सविस्तर…