• Download App
    New record : औरंगाबादमधील शिक्षकाने एका मिनिटात मारल्या 152 दोरी उड्या , एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद|New record: Aurangabad teacher kills 152 ropes in one minute, recorded in Asia Book of Records and India Book of Records

    New record : औरंगाबादमधील शिक्षकाने एका मिनिटात मारल्या 152 दोरी उड्या , एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

    दरम्यान सुयश नाटकर यांची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.New record: Aurangabad teacher kills 152 ropes in one minute, recorded in Asia Book of Records and India Book of Records


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबाद येथील क्रीडा शिक्षकाने एका मिनिटात 152 दोरीवरच्या उड्या मारत विक्रम प्रस्थापित केला आहे. सुयश नाटकर असे त्या शिक्षकाचे नाव आहे. दरम्यान सुयश नाटकर यांची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.विक्रम करत असताना मनावर दडपण होते. पहिल्यांदा रेकॉर्ड करताना दोन ते तीन वेळेस सराव केल्यावर विक्रम रचल्याचे सुयश नाटकर म्हणाले.

    दोन विक्रमांची केली नोंद

    सुयश नाटकर क्रीडा शिक्षक आहेत. ते विद्यार्थ्यांना दोरीवरच्या उड्या आणि स्केटिंग सारखे क्रीडा प्रकार शिकवतात. यापुर्वी दोरीवरच्या उड्या मारण्यात तीस सेकंदात 74 उड्या असा विक्रम नोंदवला गेला होता. तो विक्रम मोडण्यासाठी सुयश यांनी तयारी केली.



    आणि 30 सेकंदात 95 तर एक मिनिटात 152 उड्या मारून नवा विक्रम रचला.सरळ हाताने दोरी वरच्या उड्या मारणे थोडे सोपे जात असे. पण, हात क्रॉस करून उड्या मारणे अवघड होते. वर्षभराच्या सरावानंतर ते शक्य झाले.

    प्रमाणपत्र मिळवण्यास चाळीस हजार रुपयांचा खर्च

    सुयश नाटकर यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केल्याचा मेल त्यांना प्राप्त झाला.दरम्यान एका विक्रमासाठी प्रत्यक्षात प्रमाणपत्र, जीएसटी आणि इतर खर्च यासाठी जवळपास 20 हजार रुपये, असा दोन विक्रमासाठी चाळीस हजार रुपयांचा खर्च येतो. मित्र परिवाराच्या सहाय्याने हे पैसे जमवून प्रमाणपत्र मिळेल, असा विश्वास सुयश नाटकर यांनी व्यक्त केला.

    New record: Aurangabad teacher kills 152 ropes in one minute, recorded in Asia Book of Records and India Book of Records

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस