विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाची गंभीर लक्षणे ओळखण्यासाठी मुंबई आयआयटीतील संशोधकांच्या टीमने ‘इन्फ्रारेड’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे. यामुळे गंभीर लक्षणे ओळखून रुग्णावर वेळेत उपचार करण्यासाठी मदत होणार आहे.New Infrared technology will help for corona detection
गंभीर कोरोना रुग्णाची स्थिती ओळखण्यासाठी ‘इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आयआयटीच्या जैवविज्ञान आणि जैव इंजिनिअरिंग विभागाने विकसित केले आहे. कस्तुरबा रुग्णालयातील १६० कोविड रुग्णांच्या गटात गंभीर प्रकरणांचे वर्गीकरण करण्यासाठी संशोधकांनी फुरियर-ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड (एफटी-आयआर) स्पेक्ट्रोस्कोपीचा रक्त चाचणी म्हणून वापर केला.
तसेच आयआयटी मुंबई, कस्तुरबा रुग्णालय, क्यूआयएमआर बर्गोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया यांच्या एकत्रित सहयोगाने हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी कोणत्याही रक्ताच्या नमुन्यातील विविध रासायनिक गटांची पातळी मोजण्यासाठी वापरली जाते.
कोविड रुग्णांच्या अभ्यासात ८५ टक्के अचूकतेसह केलेली चाचणी ही उपचारादरम्यान उपयुक्त ठरू शकते. या चाचणीनंतर रुग्णांचे प्राथमिक मूल्यांकन, कोरोना रुग्णाची काळजी घेण्याची निकड ठरवण्यासाठी जिथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या भागात या चाचणीचा वापर केला जाऊ शकतो.
New Infrared technology will help for corona detection
महत्वाच्या बातम्या
- फाशी दिलेल्या हजारा नेत्याचा पुतळा तालिबानी दहशतवाद्यांकडून उद्वस्त, महिला गव्हर्नरही ताब्यात
- लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडोंच्या उपस्थितीत मुलीचा विनयभंग, ४०० जणांविरोधात गुन्हा
- धोकेबाज पाकिस्तानला हाताळण्यात अमेरिकेला अपयश, दहशतवादी तालिबानला फायदा
- महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे सर्वत्र संताप, दिल्लीत भाजपची पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने