कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे लागू होणाऱ्या निर्बंधांसंबंधी काढण्यात आलेल्या आदेशात अंशत: सुधारणा करण्यात आल्या आहेत. NEW COVID GUIDELINES: Improvement of Covid Restrictions – Shops closed at this time except for the most essential in the state including Mumbai …
विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनासह त्याचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या नवे रेकॉर्ड बनवत आहे. अशातच राज्य सरकारने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. सरकारतर्फे सोमवारपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत अंशत: सुधारणा करण्यात आली आहे.
कोरोनाचा (Covid 19) वाढता धोका पाहाता आता मुंबईसह राज्यात (New Restrictions in Mumbai and Maharashtra) अत्यावश्यक नसलेली दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याचे नव्या आदेशात म्हटले आहे. नवे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मुंबईसह राज्यात अत्यावश्यक नसलेली दुकाने रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी ब्युटी पार्लर आणि जिम 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील, असा निर्णय घेतला होता. त्यात आता दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील आदेश मिळेपर्यंत दुकानांबाबत घेतलेल्या निर्णय अंमलात राहील, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
NEW COVID GUIDELINES: Improvement of Covid Restrictions – Shops closed at this time except for the most essential in the state including Mumbai …
महत्त्वाच्या बातम्या
- रयतमधील गैरकारभार,भ्रष्टाचाराचा शिवसेनेच्या आमदाराकडून भांडाफोड, बारामतीतील एक जण आहे ‘कलेक्टर’, शरद पवारांनी अध्यक्षपद सोडविण्याची मागणी
- ममता गोव्यात येऊन राजकीय पायरोवा करू शकतात, पण शिवसेना – राष्ट्रवादी का नाही करू शकत??
- खलिस्थानवाद्यांनी घेतली पंतप्रधानांचा ताफा अडविल्याची जबाबदारी, चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही धमकी
- उत्तर प्रदेशात भाजपच राखणार सत्ता, पंजाबमध्ये आपचा उदय, कॉँग्रेसचा सगळ्याच राज्यांत सुफडासाफ