• Download App
    फडणवीसांना टार्गेट करण्याची जरांगे + देशमुखांची कुवत नाही, त्यांचा बोलविता धनी वेगळाच; नारायण राणेंचे वर्मावर बोट!! Neither Manoj Jarange nor Anil Deshmukh can target devendra Fadnavis

    फडणवीसांना टार्गेट करण्याची जरांगे + देशमुखांची कुवत नाही, त्यांचा बोलविता धनी वेगळाच; नारायण राणेंचे वर्मावर बोट!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षण किंवा अन्य कुठल्याही मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याची मनोज जरांगे किंवा अनिल देशमुख यांची कुवत नाही. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, अशा स्पष्ट शब्दांमध्ये भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगे, अनिल देशमुख आणि अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्या वर्मावर बोट ठेवले. अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली मुळात त्यांना अर्थसंकल्प समजतच नाही त्यांना मी अर्थसंकल्प समजावून सांगेन, असा टोमणा नारायण राणे यांनी मारला. Neither Manoj Jarange nor Anil Deshmukh can target devendra Fadnavis

    नारायण राणे यांनी आज बऱ्याच दिवसांनी मुंबईतल्या भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय अर्थसंकल्पापासून मराठा आरक्षण या सगळ्या विषयांवर त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. राज ठाकरे 225 ते 250 लढवणार आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा, असे नारायण राणे म्हणाले.

    मनोज जरांगे आणि अनिल देशमुख सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत, या प्रश्नावर बोलताना नारायण राणे म्हणाले, पत्रकारांनी ज्यांची नावे घेतली, त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला टार्गेट करण्याची कुवत नाही. जरांगे आणि देशमुख यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. तो त्यांच्याकडून काही बोलून घेतो. जरांगे यांच्या मागे अन्य कुणाची तरी ताकद आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही त्यांची वैयक्तिक मागणी आहे. ती मराठा समाजाची मागणी नाही. मराठा समाजाला घटनेच्या कलम 15 – 16 (4) नुसार शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मागासचे आरक्षण मिळावे ही मराठा समाजाची मूळ मागणी आहे. ती राज्य सरकारने पूर्ण केली आहे.

    भाजपच्या उमेदवारांना पाडा, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले कुणी कुणाला पाडा म्हणल्याने निवडणुकीत पाडण्याची कोणाची कुवत येत नाही. तेवढी महाराष्ट्रात तरी कोणाची क्षमता नाही. मनोज जरांगे यांच्या मागे वेगळी ताकद आहे आणि त्याची कारणे पण थोडी वेगळी आहेत, अशा शब्दांमध्ये नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांचे प्रत्यक्ष आणि शरद पवार यांचे अप्रत्यक्ष वाभाडे काढले.

    Neither Manoj Jarange nor Anil Deshmukh can target devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!