• Download App
    NEET Paper Leak Case: Manisha Mandhare Leaked Biology Paper from Memory, Court Grants 10-Day CBI Custody NEET पेपरफुटी प्रकरण; मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही चकित

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरण; मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही चकित

    NEET Paper Leak Case

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : NEET Paper Leak Case  नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचे मूळ आणि तांत्रिक दुवे शोधण्यासाठी न्यायालयाने मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.NEET Paper Leak Case

    नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड शिवराज मोटेगावकर असल्याचे उघड झाले असून, त्यानेच पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोघांची एनटीएच्या पॅनेलमध्ये वर्णी लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोटेगावकरने रचलेल्या या कटानुसार मनीषा मांढरेची बायॉलॉजी आणि कुलकर्णीची केमिस्ट्री या विषयांचे पेपर सेट करण्यासाठी निवड करण्यात आली होती, जेणेकरून हे दोघेही थेट मोटेगावकरपर्यंत पेपर पोहोचवू शकतील. अखेर, मोटेगावकर हा पेपर लीक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचा खुलासा झाला आहे.NEET Paper Leak Case



    मनीषा मांढरेच्या विरोधात कोणताही तांत्रिक पुरावा नाही

    संशयित आरोपी मनीषा मांढरे हिने पेपर फोडण्यासाठी कोणताही कागद किंवा मोबाईल न वापरता थेट आपल्या तल्लख स्मरणशक्तीचा वापर केल्याचा खुलासा झाला आहे. तिला परीक्षेचे सर्व प्रश्न तोंडपाठ असल्याने तिने मागे कोणताही तांत्रिक किंवा प्रत्यक्ष पुरावा सोडलेला नाही, ज्यामुळे सध्या सीबीआयसारखी मोठी तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. प्रत्यक्षात या प्रकरणातील दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिने घेतलेल्या नावावरून मांढरेला ताब्यात घेण्यात आले असले, तरी कोणत्याही ठोस पुराव्याअभावी सीबीआयसमोर या गुन्ह्याची उकल करण्याचे आणि तिच्याविरोधात पुरावे गोळा करण्याचे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

    सगळे प्रश्न डोक्यात

    गेल्या 25 वर्षांपासून बायॉलॉजी विषय शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळेच मनीषा मांढरेला परीक्षेचा कोणताही प्रश्न कुठेही लिहून ठेवण्याची गरज भासली नाही, तर तिने पेपर सेट केल्यानंतर ते सर्व प्रश्न थेट आपल्या डोक्यात ठेवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचे समोर आले आहे.

    NEET Paper Leak Case: Manisha Mandhare Leaked Biology Paper from Memory, Court Grants 10-Day CBI Custody

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Money Laundering Case : ईडीने घेतला खरातचा ताबा; मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी:नाशिक रोड कारागृहातून बंदोबस्तात मुंबईकडे

    Maharashtra : राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करार

    Cabinet : ओबीसी नॉन क्रीमी लेअर मर्यादा 15लाख करण्याची मंत्रिमंडळ उपसमितीची शिफारस; 43 नव्या जातींचा केंद्रीय यादीत समावेशाचा प्रस्ताव