राज्य शासनाने २२ आँक्टोेबरपासून थिएटर आणि नाट्यगृहं सुरू करण्याच्या नियमावलीत बदल करण्याबाबत कोल्हेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. ज्यात त्यांनी राज्य शासनाने २२ आँक्टोेबरपासून थिएटर आणि नाट्यगृहं सुरू करण्याच्या नियमावलीत बदल करण्याबाबत विनंती केली आहे. राज्य शासनाने SOP जाहीर करून २२ आँक्टोबरपासून राज्यात थिएटर आणि नाट्यगृह सुरू करण्याबाबत नियमावली जाहीर केली. ज्यात थिएटर आणि नाट्यगृहांमध्ये ५० टक्के आसनक्षमता आणि दोन प्रेक्षकांमधील एक आसन रिकामं ठेवण्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावरच अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. NCP VS SHIVSENA: Letter to Amol Kolhe Uddhav Thackeray! The rules for starting a theater are at the root of the entertainment business
यात अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे की राज्य सरकारचा हा नियम थिएटर व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारा आहे. नाटक व चित्रपट हे कौटुंबिक मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे सहकुटुंब नाटक पाहायला जाणारे प्रेक्षक नाटक पाहायला जाणारच नाहीत.दुसरी महत्वाची बाब म्हणजे ५० टक्के क्षमतेने नाट्यप्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कोविडचे संकट गंभीर असल्यामुळे नाटक,चित्रपट मनोरंजन व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या हजारो छोट्या-मोठ्या कलावंतांसह तांत्रिक कर्मचारी आदींची आर्थिक कुचंबणा झाली असतानाही त्या परिस्थितीत सर्वांनी शासनाला सहकार्य केले. आता ट्रेन,बसेससह सार्वजनिक वाहतूक,मॉल्स तसेच दैनंदिन गर्दीच्या ठिकाणी शासनाने २ डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत देत परवानगी दिली असताना केवळ थिएटरला ५० टक्के क्षमतेची अट व्यावसायिकदृष्ट्या मनोरंजन क्षेत्रासाठी हानिकारक आहे.
कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रेक्षकांना तसेच कुटुंबांना नाट्य वा चित्रपटगृहात येत असल्यास एक आड एक बैठक व्यवस्थेएेवजी सलग बैठक व्यवस्था अशी नियमावलीत सुधारणा केल्यास थिएटरना परवानगी दिल्यास आधीच डबघाईस आलेल्या मनोरंजन व्यवसायावर उपजिविका असलेल्या हजारो कलावंत,तंत्रज्ञ,कर्मचारी आदिंना दिलासा मिळू शकेल. म्हणून अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की २२ आँक्टोबरपासून थिएटर सुरू करण्यासाठीच्या नियमावलीत बदल करून कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रेक्षकांना परवानगी देऊन १०० टक्के आसन क्षमतेने थिएटर सुरू करण्याची सुधारीत नियमावली जाहीर करावी.
NCP VS SHIVSENA: Letter to Amol Kolhe Uddhav Thackeray! The rules for starting a theater are at the root of the entertainment business
महत्त्वाच्या बातम्या
- Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर 956, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले 4500 रुपये
- पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ’15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन