विशेष प्रतिनिधी
नाशिक : पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन केले. महाराष्ट्रात नव्या राजवटीत महिला का सुरक्षित नाहीत असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला पण नाशिक जिल्ह्यातल्या देवळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचाच पदाधिकारी आपल्या हॉटेलमध्ये कुंटणखाना चालवत होता त्याविषयी मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प राहिले.
स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकाराविरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील झाले होते. कालच सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेविषयी ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात गृहमंत्रालय अपयशी ठरत असल्याचा ठपका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला.
पण नाशिक जिल्ह्यातल्या देवळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सुनील आहेर उर्फ गोटू आबा हा हॉटेल वेलकम मध्ये कुंटणखाना चालवत होता आणि त्या कुंटणखान्यामध्ये बांगलादेशी तरुणी आढळून आल्या. त्या पोलिसांनी पकडल्या. पोलिसांनी हॉटेल मॅनेजरला पकडले पण गोटू आबा मात्र फरार झाला. देवळातल्या घटनेच्या तारा बांगलादेशी रॅकेट पर्यंत पोहोचल्या. या गंभीर घटनेविषयी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कुठला चकार शब्द काढला नाही किंवा त्या विरोधात कुठल्या आंदोलन उभे केले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने लोणावळ्यामध्ये आईला मारहाण केली. त्या प्रकाराबद्दल ही दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प बसले. भाजप किंवा शिवसेनेने देखील हा विषय अद्याप लावून धरलेला नाही.+
NCP-SCP staged a protest outside Swargate police station against the Pune Swargate bus depot rape incident
महत्वाच्या बातम्या
- नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३००० रुपये वाढून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा!!
- Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला, कॉक्स बाजार एअरबेसवर दंगलखोरांचा हल्ला
- पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता केला जारी
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता वितरित; ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२००० कोटी रुपये जमा!!