‘’ही लढाई एका व्यक्तिच्या विरोधात नाही’’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘’बापाच्या अन् आईचाबाबतीत नाद करायचा नाय. बाकी कुणाबद्दलही बोला, आमच्यावर टीका करा, काहीही करा. पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काहीही ऐकून घेऊ.’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज वाय.बी.चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाच्या पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना अजित पवार गटाला दिला. NCP MP Supriya Sule criticizes Ajit Pawar group
’महाराष्ट्रात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाली. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ३० पेक्षा अधिक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. एवढचं नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचा मेळावा पार पडला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘’एक सांगते महिला आहे मी, छोटसं बोललं तर टचकन डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा संघर्षाची वेळ येते, तीच आहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. हा निर्णय आणि जबाबदारी आज आपल्या सर्वांवर आली आहे. ही लढाई एका व्यक्तिच्या विरोधात नाही. या भाजपाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे, ही लढाई आहे. मला अजून ते शब्द आठवत आहे, चार-पाच वर्षांपूर्वी मन थोडं हळवं होतं, आता घट्ट झालं आहे. त्यामुळे ज्यांनी घट्ट केलं त्यांची मनापासून आभारी आहे.’’
याशिवाय ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काय म्हणायचे? नॅचरली करप्ट पार्टी. ना खाऊंगा ना खाणे दुंगा. लेकीन जब मुझे जरुरत पडेगी तो त्याच नॅचरली करप्ट पार्टीचं सगळं खाऊन टाकेन. त्यामुळे माझा आज भाजपावर आरोप आहे, या देशात सगळ्यात भ्रष्टाचारी पार्टी कुठली जर असेल, तर ती भाजपा आहे.’’ असाही सुप्रिया सुळेंनी यावेळी आरोप केला.
NCP MP Supriya Sule criticizes Ajit Pawar group
महत्वाच्या बातम्या
- भुजबळांनी उलगडले बंडाचे “रहस्य”; शरद पवार आमचे गुरु, गुरुपौर्णिमेलाच त्यांना दिली सत्तेची गुरुदक्षिणा!!
- आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य
- पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स!!; 41 आमदार गटात असल्याचा तटकरेंचा दावा
- विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसचे वेट अँड वॉच, आमदारांच्या बैठकीत कोणतीही चर्चा नाही