• Download App
    अनंत गीते यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बगोळ्याचे शिवसेना - राष्ट्रवादीत जोरदार पडसाद|NCP MP Sunil Tatkare targets Anant Gite over his remarks on Sharad Pawar

    अनंत गीते यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बगोळ्याचे शिवसेना – राष्ट्रवादीत जोरदार पडसाद

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आज श्रीवर्धन मधून टाकलेल्या राजकीय बॉम्ब गोळ्याचे जोरदार पडसाद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमटले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुढे येऊन अनंत गीते यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.NCP MP Sunil Tatkare targets Anant Gite over his remarks on Sharad Pawar

    शरद पवार हे शिवसेनेचे नेते होऊ शकत नाहीत. आमचे आमचे गुरु तर होऊच शकत नाहीत. आमचे गुरू फक्त एकच बाळासाहेब ठाकरेच आहेत, असे वक्तव्य अनंत गीते यांनी केले होते.



    त्यापुढे जाऊन अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे त्यामुळे दोन्ही काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत असे वक्तव्य केले होते त्यावर राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    सुनील तटकरे यांनी अनंत गिते यांना अडगळीत पडलेले नेते असे बिरुद लावून घेतले आहे. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या दबावाखाली अनंत गीते दबले आहेत. त्यांची राजकीय अवस्था पहावत नाही. ते अडगळीत पडल्याने असली वक्तव्य करीत आहेत, अशी टिका सुनील तटकरे यांनी केली आहे.

    तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुरुवातीला मला हे वक्तव्य माहिती नाही, असे सांगितले होते. परंतु नंतर राऊत यांनी शरद पवार हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. त्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालविले आहे.

    हे सरकार पाच वर्षे टिकेल. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार हवे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी अनंत गीते यांच्यावर सुनील तटकरे यांनी केलेल्या थेट टीकेसारखी टीका करण्याचे टाळले आहे.

    NCP MP Sunil Tatkare targets Anant Gite over his remarks on Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस