प्रतिनिधी
पुणे – महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधला राजकीय तणाव स्थानिक पातळीपर्यंत झिरपल्याचे पाहायला मिळते आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वातील सुप्त संघर्ष स्थानिक राजकारणात उफाळून येताना दिसतो आहे. NCP MP Dr. Amol Kolhe targets shiv sena leader Shivajirao Adhalrao Patil
शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांच्या राजकारणात याचा प्रत्यय आला. शिरूरचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नारायणगाव बायपासच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर नेम धरला पण त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि शरद पवारांचे नाव घेऊन आपला राजकीय वाद राज्याच्या नेतृत्वापर्यंत ताणला.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, की निवडणुका संपल्या की राजकारण संपले पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय. तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळते आहे. वयस्कर नेत्याने असे पोरकटपणाने वागावे याचे मला आश्चर्य वाटते, अशी बोचरी टीका त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता केली.
ते म्हणाले, की माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. पण संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडते? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणे हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल आणि हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. ही गोष्ट संबंधितांनी विसरू नये, असा इशारा डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसंपर्क अभियान शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरू केले आहे. प्रत्येक गावात, शहरात ते जाऊन शिवसंपर्क अभियानातून कार्यक्रम घेऊन डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्याला नारायणगाव बायपासच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
NCP MP Dr. Amol Kolhe targets shiv sena leader Shivajirao Adhalrao Patil
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न
- जम्मू-काश्मिरात बकरीदला गाय व उंट यांच्या कुर्बानीवर बंदी, सरकारकडून आदेश जारी
- महामारीदरम्यान देशात UPIच्या माध्यमातून वाढले डिजिटल व्यवहार, गतवर्षी झाले 41 लाख कोटींचे ट्रान्झॅक्शन
- टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप