• Download App
    इंधन दरवाढीवर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांचे मिश्किल ट्विट होतेय व्हायरल | NCP MLA Rohit Pawar's mischievous tweet on fuel price hike goes viral

    इंधन दरवाढीवर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांचे मिश्किल ट्विट होतेय व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वाढत्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमुळे विरोधी पक्ष नेते केंद्र सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. या दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

    NCP MLA Rohit Pawar’s mischievous tweet on fuel price hike goes viral

    वाढलेल्या नवीन दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. झालेली ही वाढ आजवरची नवी आणि विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात आली आहे. तर आता सामान्य नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी आता 100 हून अधिक रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. ही परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये पाहायला मिळते आहे.

    या सर्व परिस्थितीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपवर अगदी मिश्कील शब्दांमध्ये टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, ‘विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेल महाग’ अशा बातम्या आज बघायला मिळाल्या. आणि ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं म्हणणाऱ्या फ्रान्सच्या राणीची आठवण झाली’ आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा, असं भाजपच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको.’


    Petrol Diesel Price : इंधन तेलाच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या, दिल्लीत पेट्रोल 104, तर मुंबईत 110 रुपयांच्या पुढे


    शनिवारी नोंदवण्यात आलेली इंधन किमतीतील दरवाढ ही विक्रमी दरवाढ होती. रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले होते. मात्र असं असलं तरी दिल्ल, मुंबईसह अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत.

    हवाई इंधन ज्या दरांमध्ये विकले जाते त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारीमध्ये वापराद्वारे पेट्रोलचे दर आता 33 टक्क्यांनी अधिक आहेत असे एकंदर दिसून येतेय. मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी 111.77 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीतही हे दर 105.84  रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर 102.52 रुपये असून दिल्लीत 94.57 रुपये आहेत.

    NCP MLA Rohit Pawar’s mischievous tweet on fuel price hike goes viral

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा