विशेष प्रतिनिधी
पुणे : बीडच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अजूनही सूचक मौन बाळगले असले, तरी त्यांनी अद्याप मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. मात्र, त्याच वेळी अजितदादांचे विश्वासू मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. मित्राने चूक केली म्हणून नेत्याचा दोष नसतो, असा दावा दत्तात्रय भरणे यांनी केला.
संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य संशयित वाल्मीक कराडने 21 दिवसानंतर सीआयडी समोर शरणागती पत्करली मात्र त्याच्या अटकेच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी राजे वगैरे नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांना यांना घेरले. पण ज्यांच्या आग्रहापोटी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले, त्या अजितदादांकडे सुप्रिया सुळे, आव्हाड किंवा संभाजी राजे यांनी साधे बोटही दाखवले नाही. अजित पवार या संपूर्ण प्रकरणात अजूनही काही बोललेले नाहीत.
Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अमर काळे यांची मागणी
मात्र अजित पवारांच्या विश्वासातले त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांचे समर्थन केले. एखाद्या मित्राने चूक केली असेल, तर त्याच्या नेत्याला दोष देता कामा नये. ज्याची चूक असेल त्यालाच दोषी धरले पाहिजे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आमचे देखील नेते आहेत, असे दत्तात्रय भरणे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, असा दावा केला.
NCP ministers support Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- वाल्मीक कराडसह 4 फरार आरोपींची बँक खाती सील; शेवटचे लोकेशन उज्जैनमध्ये, नंतर गायब
- 2025 मध्ये वर्षभर अमित शाह काँग्रेसच्या टार्गेटवर; पक्षाचे नेते “नवा मोदी” बनवायच्या असाईनमेंट वर!!
- Manipur : मणिपूरमध्ये सलग 5व्या दिवशी गोळीबारात महिला व पत्रकार जखमी; CM म्हणाले- कुकी अतिरेक्यांचा शांतता-सौहार्दावर हल्ला
- Pandharpur : पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात