• Download App
    NCP - MIM Alliance : इम्तियाज जलील यांनाच एमआयएम सोडून राष्ट्रवादीत येण्याची छगन भुजबळांची ऑफर!!|NCP - MIM Alliance: Chhagan Bhujbal's offer to Imtiaz Jalil to leave MIM and join NCP !!

    NCP – MIM Alliance : इम्तियाज जलील यांनाच एमआयएम सोडून राष्ट्रवादीत येण्याची छगन भुजबळांची ऑफर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा आता स्पष्ट होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे टिकणार, असे आघाडीतील नेते म्हणत असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली वेगळी वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आज अचानक सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएम यांच्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.NCP – MIM Alliance: Chhagan Bhujbal’s offer to Imtiaz Jalil to leave MIM and join NCP !!

    महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी आणि एमआयएम यांची संभाव्य आघाडी सतत चर्चेत ठेवण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या ऑफरचे स्वागत केले आहे, तर त्या पलिकडे जाऊन राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार इमतियाज जलील यांनाच एमआयएम सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.



    इम्तियाज जलील जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर पवार साहेब त्यांचे स्वागतच करतील. इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीच्या धोरणानुसार काम करावे, अशी ऑफर छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याच वेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे पूर्ण करेल, असा दावाही केला आहे.

    सुप्रिया सुळेंकडून स्वागत

    इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सूचक ट्विट केले आहे.

    समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही आनंदाची गोष्ट आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळेंचे हे विधान राष्ट्रवादी-एमआयएमच्या युतीसाठी सकारात्मक असल्याने आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

    राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र येऊन काम करायचे असल्यास सगळ्याच समविचारी पक्षांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे. विकास कामांसाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचं भलं होणार असेल तर कुठल्याही राज्यासाठी ही चांगलीच गोष्ट असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत शिवसेनेची भूमिका काय याबाबत फारशी माहिती नाही. सगळा विषय समजून घेतल्यावरच याबाबत भाष्य करणे योग्य ठरेल, अशी सावध भूमिकाही त्यांनी प्रतिक्रिया देताना घेतली आहे.

    इम्तियाज जलील यांची ऑफर

    खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांच्यात आघाडीची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. एमआयएमचे खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

    NCP – MIM Alliance: Chhagan Bhujbal’s offer to Imtiaz Jalil to leave MIM and join NCP !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस