• Download App
    राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाबरोबर रोज बोलणी सुरू, आमच्याबरोबर किती दिवस राहतील माहीत नाही – पृथ्वीराज चव्हाण NCP is in daily talks with BJP Prithviraj Chavan

    राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाबरोबर रोज बोलणी सुरू, आमच्याबरोबर किती दिवस राहतील माहीत नाही – पृथ्वीराज चव्हाण

    पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मोठा प्रश्न

    विशेष प्रतिनिधी

    निपाणी : महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाबरोबर रोज बोलणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात त्यांनी हे विधान केलं. NCP is in daily talks with BJP Prithviraj Chavan

    प्रचारसभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘’भाजपाला विजय मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. ‘’कुणाकुणाची तिकीटं कधी-कधी कापली?, मग कुठंतरी जेडीएसला काहीतरी रसद पुरवा, इथं मी ऐकलं की राष्ट्रवादीतील पार्टीने इथे उमेदवार उभा केला आहे. पण काय झालं, की ते अजून आमच्याबरोबर आहेत, किती दिवस राहतील माहीत नाही, कारण भाजपाबरोबर त्यांची रोज बोलणी सुरू आहे. रोज दैनिकात बातम्या येत आहेत की कोण नेता जाणार, कोण राहणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांच्या त्यांनी घ्यावा.’’

    याशिवाय ‘’राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झालेला आहे. त्यांना काही इतर राज्यात मतं मिळाली नाहीत म्हणून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून टाकला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन जर मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला कदाचित राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळेल, म्हणून ही टक्केवारीसाठी निवडणूक आहे. भाजपाची टक्केवारीची निवडणूक वेगळी आहे, राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. सगळा टक्केवारीचा विषय आहे.’’ असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

    NCP is in daily talks with BJP Prithviraj Chavan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !