• Download App
    राष्ट्रवादीची डबल गेम : एकीकडे पुण्यातल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे पवारांचे दिल्लीतून बळ; दुसरीकडे राज्यसभेत मतदानापासून काढला पळ!!NCP double game On one hand, Pawar's strength from Delhi to fight the workers in Pune; On the other hand, he ran away from voting in the Rajya Sabha!!

    राष्ट्रवादीची डबल गेम : एकीकडे पुण्यातल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे पवारांचे दिल्लीतून बळ; दुसरीकडे राज्यसभेत मतदानापासून काढला पळ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही डबल गेम खेळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे पुण्यातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी लढण्यासाठी दिल्लीतून बळ दिले, तर दुसरीकडे राज्यसभेत मात्र दिल्ली विधेयकावर इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान करण्यापासून पळ काढला!! NCP double game On one hand, Pawar’s strength from Delhi to fight the workers in Pune; On the other hand, he ran away from voting in the Rajya Sabha!!

     पुण्यातल्या कार्यकर्त्यांची दिल्लीत भेट

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी शरदनिष्ठ गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत शरद पवारांचे निवासस्थान 6 जनपथ येथे जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवारांनी आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपशी तळजोड करणार नाही. भाजपशी लढणार, असा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी अजिबात संभ्रमात राहू नये. आपण भाजप विरुद्ध उभे राहणार आहोत, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी अजितनिष्ठ गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह बहाल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारी यंत्रणांवर दबाव आणल्याचा आरोप शरद पवारांनी केला. राष्ट्रवादीतल्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांना पवारांनी दिल्लीत बसून लढण्याचे बळ दिले.



    यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

    पण एकीकडे आपल्याशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देताना पवारांनी राज्यसभेत मात्र दिल्ली सेवा विधेयकावर मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हिपच काढला नाही. त्यामुळे प्रफुल्ल पटेल मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले तरीही आता त्यांच्यावर पक्षांतर बंदी कलमानुसार कारवाई होऊ शकणार नाही, अशी “व्यवस्था” पवारांनी केली.

    राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार आहेत त्यापैकी प्रफुल्ल पटेल हे अजितनिष्ठ गटात आहेत, तर स्वतः शरद पवार, फौजिया खान आणि वंदना चव्हाण हे शरदनिष्ठ गटाचे खासदार आहेत. पण संसदेत राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसू नये म्हणून पवारांनी चलाखीने दिल्ली सेवा विधेयकावर मतदानासाठी राष्ट्रवादीचा व्हिपच काढला नाही. तो व्हिप काढला असता आणि प्रफुल्ल पटेल यांनी सेवा विधेयक दिल्ली सेवा विधेयकाच्या विरोधात मतदान केले असते किंवा ते गैरहजर राहिले असते तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांची खासदारकी रद्द करावी लागली असती.

    पवारांनी व्हिप न काढून हा धोका टाळला. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी बचावली. हीच नेमकी पवारांची डबल गेम आहे. एकीकडे कार्यकर्त्यांना भाजप विरोधात लढण्याचे बळ द्यायचे आणि दुसरीकडे भाजप सरकारने आणलेल्या दिल्ली सेवा विधेयकावर मतदान करणे टाळायचे किंवा पक्षात फूट पडलेली दिसू नये याची “काळजी” घेत प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी वाचवायची, अशी ही डबल गेम आहे.

    NCP double game On one hand, Pawar’s strength from Delhi to fight the workers in Pune; On the other hand, he ran away from voting in the Rajya Sabha!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस