वृत्तसंस्था
सांगली : इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणासाठी जनतेचा मोठा पाठींबा मिळत आहे. पण, राजकीय साठमारीत नामकरण लांबत चालले आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ऐनवेळी दांडी मारली. त्यामुळे शिवसेनेचा पचका झाला आहे. NCP corporator absent from Ishwarpur naming meeting; Shiv Sena’s bang, naming is long again
पंधरा दिवसांपासून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सागर मालगुंडे व कार्यकर्त्यांनी शहरात नामकरणासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. यामध्ये ३५ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून पाठींबा दर्शवला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेत विशेष सभा घेऊन प्रस्ताव सर्वांनुमते मंजूर होणार होता.
यासाठी शिवसेनेने नगरपालिका आवारात जय्यत तयारी करून शक्ती प्रदर्शन केले होते. मात्र ऐन वेळेस राष्ट्रवादी नगरसेवकांनी दांडी मारली. आता या मुद्यावर २७ डिसेंबरला पुन्हा विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे. एकंदरीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभेला दांडी मारून नामकरण प्रस्तावाला विरोध केल्याचे स्पष्ट होत आहे. आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सुबुद्धी मिळावी, यासाठी शिवसेना नगरसेवकांनी दत्ताची आरती केली.
NCP corporator absent from Ishwarpur naming meeting; Shiv Sena’s bang, naming is long again
महत्त्वाच्या बातम्या
- Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्रात!आज प्रवरानगर-सहकार परिषद-शिर्डी दर्शन;उद्या पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निवासस्थानी भेट
- अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; देशातील पहिली सहकार परिषद विखे पाटील यांच्या प्रवरानगरमध्ये
- ३१ डिसेंबरला संपणार समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ; कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ नाही
- रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे जयंत पाटलांनी केला मुंबई लोकलने प्रवास
- डेल्टापेक्षा ओमिक्रॉन तुलनेने कमी धोकादायक, तज्ञांचा निर्वाळाडेल्टापेक्षा ओमिक्रॉन तुलनेने कमी धोकादायक, तज्ञांचा निर्वाळा