विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद एकदा तरी मिळावे म्हणून पोस्टर्स वर वारंवार झळकणारे मुख्यमंत्री त्यांच्या समर्थकांना हवे असले, तरी महाराष्ट्राच्या जनतेला मात्र ते नको आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा फक्त तीन नावांमध्येच सुरू आहे. ती नावे म्हणजे देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे!! हे तिघेच महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. बाकीचे पोस्टर्स वरचे भावी मुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले हे जनतेच्या सर्वेक्षणात पिछाडीवर आहेत. NCP, Congress leaders lag behind in survey
विधानसभेची निवडणूक अगदी दोन महिन्यांवर आलेली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलेला नाही.
महायुती, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मुख्यमंत्रिपद पुन्हा एकदा कळीचा मुद्दा ठरु शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी 16 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत राज्यात एक सर्वेक्षण केले. निवडणुकीनंतर कोणाला मुख्यमंत्रिपदी पाहायला आवडेल, असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला होता.
राज्यातील जनतेचा मूड नेनेंनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसला. सर्व्हेत सहभागी झालेल्या 23 % लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली, तर दुसऱ्या स्थानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 21 % मते मिळाली, तिसऱ्या नंबरवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. शिंदेच मुख्यमंत्रिपदी राहावेत असे 18 % लोकांना वाटते.
अजितदादांना, सुप्रिया सुळे
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांना 7 %, तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनादेखील 7 % लोकांची पसंती मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत असं केवळ 2 % लोकांना वाटते. सर्व्हेत सहभागी झालेल्या 22 % लोकांनी ‘माहिती नाही’ हा पर्याय निवडला.
अजितदादा, सुप्रिया सुळे, नाना पटोले, जयंत पाटील, रोहित पवार यांचे समर्थक या नेत्यांची नावे सतत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स वर वारंवार झळकत असतात. पण प्रत्यक्षात जनतेचा कौल मिळवण्यात मात्र या नेत्यांना अपयश आल्याचे सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते.
कोणाला कोणत्या भागातून पाठिंबा?
1. देवेंद्र फडणवीस : प्रामुख्यानं नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिकमधून पाठिंबा
2. उद्धव ठाकरे : प्रामुख्यानं मुंबई, संभाजी नगर, धाराशिव आणि हिंगोलीतून पाठिंबा
3. एकनाथ शिंदे : ठाणे, एमएमआर, संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूरातून पाठिंबा
4. अजित पवार/सुप्रिया सुळे : राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून पाठिंबा
5. नाना पटोले : भंडारा, चंद्रपुरातून पाठिंबा
NCP, Congress leaders lag behind in survey
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!