प्रतिनिधी
उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या तुळजा भवानीला अनेक भाविक नवस करत असतात. असाच एक मोठा नवस आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आई तुळजा भवानीला केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा मुख्यमंत्री होऊ दे, संपूर्ण पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईन, असा नवस सुप्रिया सुळे यांनी आई तुळजा भवानीला केल्याचे दिसत आहे. NCP be Chief Minister in Maharashtra; Supriya Sule’s to Tulja Bhavani
राज्यात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. त्यामुळे आता पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. तुझ्या आशीर्वादाने जर तसं झालं तर संपूर्ण पक्ष घेऊन तु्झ्या दर्शनाला येईन, असा नवस सुप्रिया सुळे यांनी तुळजापूरच्या भवानी आईला केला आहे.
आई भवानीचे घेतले आशीर्वाद
खासदार सुप्रिया सुळे या सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर असून, रविवारी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावर्षी राज्यात चांगला पाऊस होऊ दे आणि बळीराजाचे राज्य येऊ दे. शेतकरी बांधवांच्या शेती मालाला चांगला भाव मिळू दे आणि सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळू दे, असेही मागणे सुप्रिया सुळे यांनी आई भवानीच्या चरणी मागितले आहे.
यावेळी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, असा प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर द्यायला आपण ज्योतिषी नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या प्रश्नाचं उत्तर योग्य तो निर्णय घेऊन जनता देईल, असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
NCP be Chief Minister in Maharashtra; Supriya Sule’s to Tulja Bhavani
महत्वाच्या बातम्या