• Download App
    NCP 51 mlas wanted to go with BJP in 2022 itself, but sharad pawar didn't take appropriate decision, claimed praful patel

    सत्तेची वळचण 1 : शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीच्या 51 आमदारांना जायचे होते सत्तेत, पवारांना दिले होते पत्र; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी कसे उतावीळ होते, याचे वर्णन प्रफुल्ल पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या ताज्या मुलाखतीत केले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले त्यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस मधले 54 पैकी 51 आमदारांना सत्तेमध्ये जायचे होते. तसे पत्र देखील या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते, पण पवारांनी त्यावेळी निर्णय घेतला नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांनी नेमलेले कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. NCP 51 mlas wanted to go with BJP in 2022 itself, but sharad pawar didn’t take appropriate decision, claimed praful patel

    प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नैसर्गिक स्वरूपच या मुलाखतीत उघड करून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेच्या वळचणी खेरीज राहता येत नाही. त्यांना सत्तेशिवाय राजकारणही करता येत नाही, हेच प्रफुल्ल पटेल यांनी मुलाखतीतून अधोरेखित केले.


    प्रफुल्ल पटेल विचारतात, राष्ट्रवादी नंबर 1 वर का नाही?; पण पक्षाचे मिशन 100 वरच मर्यादित


    उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेत जायचे होते. 54 पैकी 51 आमदारांनी आपल्या सह्यांचे निवेदन शरद पवारांना दिले होते. पण त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करून योग्य वेळ साधली आणि मुख्यमंत्रीपद पटकावले, असे प्रफुल्ल पटेल यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यावेळी जर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने योग्य निर्णय घेतला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाच सत्तेवर जाऊन पोहोचली असती. कदाचित मुख्यमंत्रीपदही मिळाले असते, असा दावाही प्रफुल्ल पटेल यांच्या या मुलाखतीत दिसतो.

    या मुलाखतीतून प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना पूर्ण एक्सपोज केले. 2022 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेवर जाण्याची तयारी चालू होती. त्याची प्राथमिकच काय पण त्यापलीकडेही चर्चा झाली होती. पण पवारांनी आयत्यावेळी कच खाल्ली. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे बंड यशस्वी झाले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाशी योग्य वाटाघाटी करून मुख्यमंत्रीपद मिळवण्यात ते यशस्वी झाले, अशी स्पष्टोक्ती प्रफुल्ल पटेल यांनी केली.

    NCP 51 mlas wanted to go with BJP in 2022 itself, but sharad pawar didn’t take appropriate decision, claimed praful patel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस