विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, असा थेट इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात दिला .भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. Nawab Malik’s reply to ‘Leave me to change the government’ rained in Pandharpur
यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलंय. मी त्यांना सांगू इच्छितो “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” . हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल.
पंढरपूरमध्ये मतं मागत असताना त्यांचा कार्यक्रम करु असे सांगून ते लोकांकडून मदत मागत आहेत . त्यांना घाबरवत आहेत हे काम देवेंद्रजीनी केले आहे. आणि गेले पंधरा महिने भाजप हेच करू इच्छित आहे. मी त्यांना सांगू इच्छितो “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल”, असं नवाब मलिक म्हणाले.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिला.
लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.