• Download App
    नवाब मलिक यांचे आरोप खोटे; बनावट नोटा 14 कोटींच्या नव्हत्या, तर 10 लाखांच्याच आसपासच्या होत्या; समीर वानखेडे यांचा पलटवार । Nawab Malik's allegations are false; The counterfeit notes were not worth Rs 14 crore, but around Rs 10 lakh; Sameer Wankhede's counterattack

    नवाब मलिक यांचे आरोप खोटे; बनावट नोटा 14 कोटींच्या नव्हत्या, तर 10 लाखांच्याच आसपासच्या होत्या; समीर वानखेडे यांचा पलटवार

    वृत्तसंस्था

    मुंबई : नवाब मलिक यांनी बीकेसीच्या छापेमारी संदर्भात जे आरोप केले आहेत ते सगळे खोटे आहेत. त्या वेळेला छापेमारीत 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या नव्हत्या, तर त्या 10 लाख रुपयांच्या आसपास होत्या, असा पलटवार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी केला आहे. Nawab Malik’s allegations are false; The counterfeit notes were not worth Rs 14 crore, but around Rs 10 lakh; Sameer Wankhede’s counterattack

    समीर वानखेडे त्यावेळी महसूल इंटेलिजन्स अधिकारी होते. त्यांचे नाव घेऊन नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हे काही अधिकाऱ्यांना आणि गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळी 14 कोटी 56 लाख रुपये बनावट नोटा सापडल्या होत्या, पण आठ लाख 80 हजार रुपयाच्या नोटा सापडल्याचे दाखवून त्यावेळी मामला रफादफा करण्यात आला असा आरोप केला होता.



    त्या आरोपपाला समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. समीर वानखेडे म्हणाले, की नवाब मलिक यांचे आरोप खोटे आहेत. त्यावेळी बीकेसी छापेमारीत सापडलेली रक्कम 14 कोटी 56 लाख एवढी अजिबात नव्हती, तर ती फक्त दहा लाखांच्याच आसपासची रक्कम होती. त्यावेळी महसूल इंटेलिजन्सने एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे तपास दिला होता. परंतु राष्ट्रीय तपास संस्थेने तो तपास पुढे केला नाही, असा खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे.

    राष्ट्रीय तपास संस्थेकडे शंभर कोटींच्या वरचे घोटाळ्यांचे तपासासाठी जात असतात. तशी कायदेशीर तरतूद आहे. नवाब मलिक यांनी दावा केलेली 14 कोटी 56 लाख रुपयांची रक्कम तसेच समीर वानखेडे यांनी दावा केलेली दहा लाखांच्या आसपासची रक्कम या दोन्ही रकमा शंभर कोटी रुपयांच्या आतमध्ये आहेत हा मुद्दा येथे महत्त्वाचा आहे.

    Nawab Malik’s allegations are false; The counterfeit notes were not worth Rs 14 crore, but around Rs 10 lakh; Sameer Wankhede’s counterattack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!