• Download App
    नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ; भाजपच्या कार्यकर्त्यांचे साताऱ्यातील पोवई नाका येथे आंदोलन । Nawab Malik should resign immediately; BJP workers protest at Powai Naka in Satara

    नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ; भाजपच्या कार्यकर्त्यांचे साताऱ्यातील पोवई नाका येथे आंदोलन

    महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करावे अशी देखील मागणी करण्यात आली. Nawab Malik should resign immediately; BJP workers protest at Powai Naka in Satara


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे नवाब मलिक यांच्या फोटोला काळे फासून निषेध करण्यात आला.१९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी जाहीर संबंध असलेल्या महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.



    महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करावे, तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी पोवई नाका येथे हे आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे ,ऍड प्रशांत खामकर, चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, रीना भणगे, सुनिशा शहा, कुंजा खंदारे, अश्विनी हुबळीकर, वनिता पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Nawab Malik should resign immediately; BJP workers protest at Powai Naka in Satara

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा