• Download App
    नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- माफी मागा नाहीतर कोर्टात जाऊ!|Nawab Malik daughter sent defamation notice to Devendra Fadnavis

    नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- माफी मागा नाहीतर कोर्टात जाऊ!

    महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर मलिक खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्यास सांगितले असून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असे म्हटले आहे.Nawab Malik daughter sent defamation notice to Devendra Fadnavis


    प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर मलिक खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्यास सांगितले असून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरातून ड्रग्ज मिळत असल्याची चर्चा केली होती. त्यामुळे मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.

    वास्तविक, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. समीर खान यांनी त्यांच्या एका दूरचित्रवाणी मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना मानसिक छळाचा सामना करावा लागला आणि त्याच बरोबर त्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यानंतरच नीलोफर मलिक खान यांनी फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

    नवाब मलिक आणि नीलोफर मलिक यांनीही या कायदेशीर नोटीसची प्रत सोशल मीडियावर टाकली आहे. यानुसार फडणवीस यांनी समीर खानवर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप केला आहे, तर या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्यात म्हटले आहे की, एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात फडणवीस यांच्या एका दाव्यालाही पुष्टी देणारे काहीही नाही.

    14 जानेवारी 2021 रोजी दाखल करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, घराची झडती घेण्यात आली आणि माझ्या अशिलाच्या घरामध्ये किंवा जवळ कोणताही संशयास्पद पदार्थ आढळला नाही, परंतु तुम्हाला असे खोटे आणि निराधार रिपोर्ट कोणत्या स्त्रोताकडून मिळाले, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे.”

    देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत असताना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी फडणवीसांवर बनावट नोटांच्या व्यवसायाला आश्रय दिल्याचा आरोप केला आहे, तर फडणवीस यांनी दावा केला आहे की, मलिक आणि त्यांचे कुटुंब संशयास्पद जमिनीच्या व्यवहारात गुंतले आहेत.

    Nawab Malik daughter sent defamation notice to Devendra Fadnavis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!