प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. Nawab malik arrested chandrakant patil says
मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला हाणला आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये तुरूंगात जाण्याची स्पर्धा लागली आहे. आधी तू आत जातो का मी जातो, असे ते एकमेकांना म्हणत आहेत. कारण तुरुंगात चांगली कोठडी मिळवण्याची त्यांच्यात स्पर्धा लागली आहे, असा टोला चंद्रकांत दादांनी लगावला आहे.
त्याच वेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एका मुलीच्या खून प्रकरणात शिवसेनेचे मंत्री राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करून तुरुंगात जावे लागले. एका मंत्र्याचा 100 कोटीचा बेकायदा बंगला पाडण्याचे आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालय द्यावे लागले. एका मंत्र्याला दुसऱ्या पत्नीपासून आपल्याला दोन मुले आहेत हे कबूल करावे लागले. बाकीच्या मंत्र्यांवर मोठ्या प्रकरणांमध्ये आरोप आहेत, हे महा विकास आघाडीचे सरकार अशा मंत्र्यांच्या भरवशावर चालले आहे.
आज ईडीने नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तसेच डी गँगशी संबंध असल्यामुळे अटक केली आहे. एकापाठोपाठ एक मंत्री असेच तुरुंगात चालले आहेत, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला आहे.
ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तुरुंगात जावे लागते. पोलीस महासंचालकांना राजीनामा द्यावा लागतो. कोर्टात एकही केसचा निकाल महाविकास आघाडीच्या सरकारच्या बाजूने लागत नाही. ओबीसी आरक्षण यापासून सगळ्या मुद्द्यांवर ते वेळकाढूपणा करतात, असे टीकास्त्र देखील त्यांनी यावेळी सोडले.
Nawab malik arrested chandrakant patil says
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांवर ईडी कारवाईचा थेट यूपी निवडणुकीशी संबंध, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय
- Nawab malik ED : राष्ट्रवादीचे मोर्चे ईडी विरोधात? की चौकशीत “कोणाचे” नाव घेऊ नये म्हणून नवाब मलिकांवर दबावासाठी…??
- भुजबळ, देशमुखांच्या अटकेच्या वेळी मोर्चे नाहीत, फक्त नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या वेळी राष्ट्रवादीचे मोर्चे!!; रहस्य काय??