• Download App
    Navneet Rana : मोदी दौऱ्यासाठी माघार; तरीही शिवसैनिकांच्या तक्रारीवरून राणा दांपत्य पोलिसांच्या ताब्यात|Navneet Rana: Modi withdraws for tour; However, on the complaint of Shiv Sainiks, Rana couple was taken into police custody

    Navneet Rana : मोदी दौऱ्यासाठी माघार; तरीही शिवसैनिकांच्या तक्रारीवरून राणा दांपत्य पोलिसांच्या ताब्यात

    प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला तरी अजून शिवसैनिकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या दांपत्याला ताब्यात घेतले आहे राणा दाम्पत्याने माघार घेतल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष करत आपला आक्रमक आणखीनच वाढवला.Navneet Rana: Modi withdraws for tour; However, on the complaint of Shiv Sainiks, Rana couple was taken into police custody

    राणा दाम्पत्याने माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरत त्यांच्या विरोधात आता खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात खार पोलिस राणा दाम्पत्याला नेण्यासाठी आले असताना त्यांनी पोलिसांसोबत यायला नकार दिला. पण अखेर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



    पोलिसांसोबत जाण्यास नकार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबई दौ-यावर येणार असल्याने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन आपला हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला. शिवसैनिकांनी जल्लोष केला. पण राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

    तसेच त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिस राणा दाम्पत्याला घेऊन जाण्यासाठी आले असता त्यांनी अटक वॉरंट दिल्याशिवाय आपण पोलिस स्थानकात येणार नसल्याचे सांगितले. पण अखेर राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    संजय राऊतांवर गुन्हा का नाही?

    पोलिस यंत्रणा ही ठाकरे सरकारच्या दबावाखाली येऊन काम करत आहे. आम्हाला जबरदस्ती पोलिस स्टेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. संजय राऊत यांनी आमच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, शिवसैनिक आमच्या घरावर हल्ला करत आहेत. पण आम्हालाही कायदा माहिती आहे, जोपर्यंत आम्हाला वॉरंट मिळत नाही तोपर्यंत आपण पोलिस स्थानकात जाणार नसल्याचे सांगत राणा दाम्पत्याने पोलिस स्थानकात जाण्यास नकार दिला आहे.

    Navneet Rana: Modi withdraws for tour; However, on the complaint of Shiv Sainiks, Rana couple was taken into police custody

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा