विशेष प्रतिनिधी
अमरावती : Navneet Rana भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करत बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.Navneet Rana
हिंदू शेरणी आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथील भाषणानंतर नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याने अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धमकी प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.Navneet Rana
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. परंतु, या निवडणुकीत एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका चांगलीच चर्चेत आली. मुले जन्माला घालण्याच्या संदर्भात नवनीत राणा यांनी वक्तव्य केले होते. तोच मुद्दा पकडत ओवेसी यांनी नवनीत राणा यांना डिवचले होते. त्यानंतर, आता पोलिसांना फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, यापूर्वी हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या एका व्यक्तीने घाणेरड्या शब्दांत नवनीत राणा यांना पत्रातून धमकी दिली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात त्यांना धमकीचे दुसरे पत्र आले होते. तेव्हा देखील नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यकाच्या फिर्यादिवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
Navneet Rana Death Threat: Former MP Threatened with Baba Siddique-Like Murder
महत्वाच्या बातम्या
- संस्कृत भारतीच्या १० संस्कृत पुस्तकांचे २२ जानेवारीला पुण्यात लोकार्पण
- कपिल सिब्बल जे बोलले, ते राजकीय सत्यच!!; पण…
- समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत
- Greenland : ग्रीनलँडमध्ये निदर्शने- ट्रम्प यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले:, म्हटले- आमचा देश विक्रीसाठी नाही