खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेतNavid-2 boat missing in Ratnagiri, six sailors missing, no contact for five days
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : रत्नागिरीच्या जयगडमधील मासेमारीसाठी गेलेली नौका समुद्रात बेपत्ता झाली आहे. नविद-२ अस या नौकेच नावं आहे.या नौकेवर तांडेलसह सहा खलाशी आहेत.तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल अशी ६ बेपत्ता खलाशी आहेत. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत.
दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून या नौकेशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही.त्यामुळे खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेत.
नेमकी घटना काय घडली
नविद-२ ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून २६ ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Navid-2 boat missing in Ratnagiri, six sailors missing, no contact for five days
महत्त्वाच्या बातम्या
- परळी शहरातून तब्बल १४० गाढवे चोरीला; संभाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार
- वंचित सोबत आघाडी, आर्यनसारख्या पैसेवाल्यांना जामिन : खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे उदगार
- पुण्यतिथी : आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज 37वी पुण्यतिथी, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली
- Farmer Protest : राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा! म्हणाले – आम्हाला जबरदस्तीने हटवले तर सरकारी कार्यालयांना गल्ला मंडई बनवू